मृत घोषित महिला सापडली प्रियकरासोबत, हत्येच्या आरोपाखाली पती तुरुंगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Crime News

मृत घोषित महिला सापडली प्रियकरासोबत, हत्येच्या आरोपाखाली पती तुरुंगात

पाटणा : हत्या होऊन मृत घोषित करण्यात आलेली महिला प्रत्यक्षात जीवंत असून पंजाबमध्ये तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचे समोर आले. बिहारमधील मोतिहारी (Motihari Bihar) येथे ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे तिचा पती तिच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी या महिलेचा भंडाफोड केला आहे.

हेही वाचा: सेक्स रॅकेटसोबतचे संबंध लपविण्यासाठी भाजप महिला नेत्याची हत्या, कुटुंबीयांचा आरोप

शांती देवी, असे महिलेचे नाव असून तिचे दिनेश राम या व्यक्ती २४ जून २०१६ ला लग्न झाले होते. पण, शांती देवी लग्नाच्या काही दिवसानंतर पतीच्या घरून पळून गेली आणि आपल्या प्रिययकरासोबत पंजाबमध्ये राहू लागली, असा आरोप तिच्यावर होता. पण, महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आणि त्याने तिचा खून केल्याचा आरोपही केला.

शांतीचे वडील योगेंद्र यादव यांनी पोलिसांना सांगितले होते की, "माझ्या मुलीने 2016 मध्ये दिनेश रामशी लग्न केले होते. परंतु 19 एप्रिल रोजी मला माहिती मिळाली की ती कुठेच सापडली नाही. मी तिच्या सासरच्या घरी जाऊन तपासले. पण ती दिसली नाही. तिच्या सासरच्यांनी मोटारसायकल आणि 50,000 रुपये रोख मागितले होते. वर्षभरात माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला.'' पीडितेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशला अटक केली असून त्याला हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांना याप्रकरणी संशय होता. त्यामुळे त्यांनी तांत्रिक टीमला मोबाईल फोनवरून शांतीचे लोकेशन ट्रेस करण्यास सांगितले. तेव्हा या घटनेला एक वेगळे वळण मिळाले. मृत घोषित करण्यात आलेली ही महिला प्रत्यक्षात पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांचे पथक तयार करून महिलेला मोतिहारी येथे आणण्यात आले.

Web Title: Bihar Woman Announced Dead Found Living With Lover In Punjab

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bihar
go to top