esakal | भयानक! कोव्हिशिल्डनंतर अवघ्या पाच मिनिटांत दिली कोव्हॅक्सीन
sakal

बोलून बातमी शोधा

सुनीला देवी

भयानक! कोव्हिशिल्डनंतर अवघ्या पाच मिनिटांत दिली कोव्हॅक्सीन

sakal_logo
By
दीनानाथ परब

पटना: कोव्हिशिल्डचा (Covishield) पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीला नंतर दुसरा डोस कोव्हॅक्सीनचा (Covaxin) दिला किंवा कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीला नंतर कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दिल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. पण पाच मिनिटांच्या अंतराने कोव्हिशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्सीनचा डोस दिल्याची घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. हा प्रकार घडला आहे बिहारची (Bihar) राजधानी पटना मध्ये. (Bihar woman gets both Covaxin Covishield shots in five minutes condition stable)

नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये एका महिलेला पाच मिनिटाच्या फरकाने कोव्हिशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्सीन लसीचा डोस देण्यात आला. सुनीला देवी असे महिलेचे नाव आहे. सुदैवाने लसींचे लागोपाठ दोन डोस घेऊनही सुनीला देवी यांची प्रकृती ढासळलेली नाही. त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

पटना ग्रामीणमधील पुनपुन गावात १६ जूनला ही घटना घडली. बेलदारीचक येथील शाळेमध्ये लसीकरण शिबीर सुरु होते. १६ जूनला मी तिथे गेली, असे सुनीला देवी यांनी सांगितले. नाव नोंदणी केल्यानंतर सुनीला देवी रांगेमध्ये उभ्या होत्या. त्यावेळी त्यांना कोव्हिशिल्ड लसीचा डोस देण्यात आला.

हेही वाचा: कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण? आदित्य कॉलेजमधील घटना

आरोग्य कर्मचाऱ्यांनी निरीक्षण करण्यासाठी म्हणून त्यांना पाच मिनिटं थांबण्यास सांगितले. शाळेत उभारण्यात आलेल्या निरीक्षण खोलीमध्ये त्या थांबल्या होत्या. त्यावेळी दुसरी एक नर्स तिथे आली. तिने सुनीला देवी यांना कोव्हॅक्सीन लसीचा डोस दिला.

हेही वाचा: ९८ दिवसानंतर पहिल्यांदाच कल्याणमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

"मी निरीक्षण खोलीमध्ये असताना एक नर्स तिथे आली व तिने मला डोस दिला. मी लसीचा डोस घेतलाय हे तिला सांगितले. पण तिने दुसरा डोस द्यायचा आहे, असे सांगून मला डोस दिला" असे सुनीला देवी म्हणाल्या. दुर्लक्षातून घडलेल्या या प्रकारासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुनीला देवींनी केली आहे. आरोग्य खात्याने लसीकरण शिबीरातील नर्सेसकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकारानंतर सुनीला देवी यांची प्रकृतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वैद्यकीय पथकावर सोपवण्यात आली होती.

loading image
go to top