esakal | ९८ दिवसानंतर पहिल्यांदाच कल्याणमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital

९८ दिवसानंतर पहिल्यांदाच कल्याणमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

sakal_logo
By
दीनानाथ परब

कल्याण: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (covid patient) घट होत आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 10000 च्या आत कोरोना रुग्णांची नोंद झालीय, तर मृत्युदरातही (death rate) घट होत आहे. शुक्रवारी 9798 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. 198 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची 59.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे तर आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण 1,16,674 जणांचा मृत्यू झाला आहे. (No Covid death in Kalyan after 98 days)

मुंबईत मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या थोडी वाढली आहे. शुक्रवारी 758 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 7.2 लाखांवर पोहोचली आहे, तर 14860 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत काल कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. 12 मार्चनंतर पहिल्यांदाच केडीएमसी क्षेत्रात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाहीय.

हेही वाचा: कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण? आदित्य कॉलेजमधील घटना

मुंबईत कोरोना रुग्णांच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे. कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता आल्याने नागरिक सार्वजनिक ठीकाणी येत आहेत. त्यामुळे मुंबई शहरात रुग्णसंख्या वाढू शकते. शुक्रवारी 30,447 कोरोना चाचण्या केल्या गेल्या. महापालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून पुढच्या आठवड्याभरात चाचण्यांवर अधिक भर देण्यात येईल,अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

हेही वाचा: प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची सोमय्यांची पोलिसात तक्रार

२७ एप्रिलला निर्बंध जारी करण्याआधी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई शहरात प्रतिदिन 45000 कोरोना चाचण्या करण्याची पालिकेची योजना असल्याचे म्हटले होते. रुग्णदुपटीची कालावधी 734 दिवसांवर पोहोचला आहे आणि आठवड्याचा दर 0.09% इतका झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या आत आहे. 78 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. 98 दिवसानंतर पहिल्यांदाच एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीय.

loading image
go to top