esakal | कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण? आदित्य कॉलेजमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण? आदित्य कॉलेजमधील घटना

sakal_logo
By
राजू परुळेकर

मुंबई: कांदिवली (kandivali) पाठोपाठ आता बोरिवलीतही (borivali)बोगस लसीकरण झाल्याची शक्यता आहे. कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीमधील रहिवाशांची लसीकरणात फसवणूक झाली. या संबंधी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच आरोपींना अटक झाली आहे. आता बोरिवलीच्या आदित्य कॉलेजमध्येही (Aditya College) असाच प्रकार घडल्याची शक्यता आहे. लसीकरणानंतर अजूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे आदित्य कॉलेजने लसीकरणाच्या आयोजकांविरोधात पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. (After kandivali fake vaccination possibility at borivalis Aditya College)

३ जून २०२१ रोजी आदित्य कॉलेजच्या आवारात लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. एका मोठ्या रुग्णालयाच्या सेल्स विभागाच्या मॅनेजरने हॉस्पिटलच्या देखरेखीखाली शिबीर होईल, असे आश्वासन दिले होते. लसीकरणासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. आमचा रोल फक्त पैसे देण्यापुरताच होता, असे आदित्य कॉलेजकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलने २०० नर्सेसना नोकरीवरुन काढलं

त्या मॅनेजरवर विश्वास ठेऊन कर्मचारी, विश्वस्त, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी लसीकरण मोहिम घेण्यात आली. कोविन अॅपवरुन लसीकरणाचा स्लॉट मिळवणे कठिण जात होते, म्हणून कॉलेजच्या आवारातच लसीकरण आयोजित करण्यात आले होते. कॉलेजशी संबंधित सर्वांचे लसीकरण व्हावे, हाच आदित्य कॉलेजचा त्यामागे उद्देश होता.

हेही वाचा: प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची सोमय्यांची पोलिसात तक्रार

अलीकडेच मीडियामधून आम्हाला कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील रहिवाशांची लसीकरणामध्ये फसवणूक झाल्याचं समजलं. आम्हाला लसीकरण प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने आम्ही पोलिसात रीतसर तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे, असे आदित्य कॉलेजकडून सांगण्यात आले.

loading image
go to top