esakal | काय सांगता? : मल्याळी भाषेत बिहारी प्रथम?
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता? : मल्याळी भाषेत बिहारी प्रथम?

एखाद्या बिगर केरळी माणसालाही भाषा शिकता येऊ शकते आणि त्यात प्राविण्यही मिळवता येतं. एका बिहारी महिलेनं हे सिद्ध करून दाखवलंय. 

काय सांगता? : मल्याळी भाषेत बिहारी प्रथम?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोल्लम (केरळ) : एखादी भाषा बोलायला शिकणं थोडं सोपं. पण, लिहायला वाचायला शिकणं थोडं अवघड असतं. त्यातल्या त्यात जर, दाक्षिणात्य भाषा फारच अवघड. अशाची एक अवघड भाषा म्हणजे मल्याळी भाषा. पण, आपण ठरवलं तर, एखाद्या बिगर केरळी माणसालाही भाषा शिकता येऊ शकते आणि त्यात प्राविण्यही मिळवता येतं. एका बिहारी महिलेनं हे सिद्ध करून दाखवलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाषा हा अडथळा असू शकत नाही, हे येथील एका स्थलांतरित बिहारी महिलेने सिद्ध केले आहे. केरळ सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी घेतलेल्या मल्याळी भाषा साक्षरता परीक्षेत ही २६ वर्षांची महिला प्रथम आली आहे. रोमिया कथूर असे तिचे नाव असून, तिने परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळविले. रोजगाराच्या शोधात पती सैफउल्लासह रोमिया २०१४ मध्ये भारतात आल्या. कोल्लम जिल्ह्यातील उमयनल्लूर गावात त्यांनी आसरा घेतला. त्यांना तीन अपत्ये असून, येथे त्या फळांचा ज्यूस विकण्याचा व्यवसाय करतात. गेल्या महिन्यात झालेल्या साक्षरता परीक्षेला त्या आपल्या चार महिन्यांच्या मुलीला घेऊन आल्या होत्या. या परीक्षेला जवळपास दोन हजार स्थलांतरित कामगार बसले होते. स्थलांतरित कामगारांना चार महिन्यांत मल्याळी शिकविण्याच्या राज्य सरकारच्या प्रकल्पांतर्गत दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. केरळमध्ये सर्वाधिक स्थलांतरित कामगार एर्नाकुलम जिल्ह्यात आहेत. या परीक्षेमध्ये दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून ३७०० कामगार उत्तीर्ण झाले. 

क्‍लिक करा - राज्याच्या विकासाला केंद्राकडून मदत नाही,संसदेत मांडणार प्रश्‍न : शरद पवार

बिहारींचे स्थलांतर 
प्रामुख्यानं बिहार आणि उत्तर भारतातील लोक हे रोजगारासाठी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या शहरांची वाट धरतात. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाषेचा अडथळा येत असल्यामुळ ते दक्षिणेतील चेन्नई, बेंगळुरू, कोची, कोईम्बतूर या शहरांकडे सहसा वळत नाहीत. पण, गेल्या काही वर्षांत बेंगळुरू आणि इतर शहरांमध्येही बिहारमधील मजूर, कामगारांचे स्थलांतर होत असताना दिसत आहे. हे मजूर हौशीनं स्थानिक भाषा शिकत आहे. त्यामुळं त्याचं कौतुकही होत आहे.