राज्याच्या विकासाला केंद्राकडून मदत नाही,संसदेत मांडणार प्रश्‍न : शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

जळगाव : राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने मदत करावयाची असते,परंतु केंद्र सरकारकडून राज्याला कोणतीही मदत होत नाही. याबाबतचा मुद्दा आपण संसदेत मांडणार आहोत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. चोपडा येथे ते बोलत होते. 

क्‍लिक करा - यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी : कृषिमंत्री दादा भुसे

चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे उद्‌घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी,आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडणार नाही. त्यांच्या मालाला हमी देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 
केंद्र शासनावर टीका करतांना ते म्हणाले, कि राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने मदत केली पाहिजे मात्र केंद्र शासन कोणतीही मदत करीत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत आपण संसदेत प्रश्‍न मांडणार आहोत. केंद्र शासनाच्या अर्थधोरणावरही त्यांनी टिका केली, ते म्हणाले देशाचे आर्थिक धोरण मजबूत करण्यासाठी उद्योग व व्यवसाय वाढ करण्याची गरज आहे.केंद्राचे शासन त्याबाबत उदासिन असल्याचे मतही त्यानीं व्यक्त केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MARATHI NEWS SHARAD PAWAR CHOPDA SUTGIRNI INOGRETION