"...हेच का तुमचं हिंदुत्व?"; बिल्किस बानो प्रकरणावरुन सामनातून भाजपाला सवाल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"...हेच का तुमचं हिंदुत्व?"; बिल्किस बानो प्रकरणावरुन सामनातून भाजपाला सवाल!

"...हेच का तुमचं हिंदुत्व?"; बिल्किस बानो प्रकरणावरुन सामनातून भाजपाला सवाल!

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बिल्किस बानोवर प्रकरण, लढा, आरोपींना झालेली शिक्षा आणि 15 ऑगस्टला झालेली माफी या घटनेवर भाष्य करण्यात आलं आहे. सामानाच्या 'न्यायाची घंटा चोरीला गेलीय' या अग्रलेखातून भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

“15 ऑगस्टपासून बिल्किस बानो प्रकरण जास्तच चर्चेत आलं आहे. गोध्रा हत्याकांडात 5 महिन्याची गरोदर असताना तिच्यावर बलात्कार झाला. त्याचबरोबर तिच्या बहीणीवरही बलात्कार करण्यात आला. तिच्या आईची आणि बिल्किसच्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात बिल्किसचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. बिल्किसने खूप वर्ष न्यायासाठी संघर्ष केला. बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींना जन्मठेप झाली. पण या वर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिवशी या 11 दोषींना माफी मिळाली आणि त्यांच्यावर फुलेही उधळली गेली. हे हिंदुत्व नाही. न्यायाची घंटा चोरीला गेल्याचा हा परिणाम! न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर बिल्किस असो की बिमला, तुमच्या पिंकाळ्यांना विचारतंय कोण?”, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

हेही वाचा: Bilkis Bano: बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला बजावली नोटीस

बलात्कारास राजमान्यता

बलात्कार, खुनास राजमान्यता, समाजमान्यता देण्याचा प्रकार घातकच आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा श्री. अधिरंजन चौधरी यांनी करताच स्मृती इराणींपासून समस्त भाजपास तो नारी शक्तीचा अपमान वाटला व न्यायासाठी ते सर्व तोंडाची घंटा वाजवीत राहिले. श्रीमती इराणी यांचा संताप पाहण्यासारखा होता. मग बिल्किस प्रकरणात या सर्व घंटा थंड का ? बिल्किस एक स्त्री आहे. तिने तिची इज्जत व स्वतःची मुलगी गमावली… त्या अन्यायाविरोधात ती एकाकी झुंजली. मोदी हे गुजरातला जातात तेव्हा त्यांनी या अत्याचारग्रस्त भगिनीच्या घरी जाऊन तिला आधार द्यायला हवा होता. प्रश्न इथे हिंदू-मुसलमानाचा नाही. तर हिंदुत्वाचा आत्मा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठऽचा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हिंदूंची मते मिळावीत म्हणून बिल्किसचे गुन्हेगार सोडले असतील तर ती प्रवृत्ती देशविघातक आहे. मग देशाला अतिरेक्यांपासून धोका आहे असे बोलण्यात अर्थ नाही. धोका तर देशातच आहे. धर्माचे रूपांतर धर्माधता व अराजकतेत होत आहे.

हेही वाचा: Bilkis Bano Case: आरोपींच्या सुटकेनंतर भीतीने मुस्लिमांनी गाव सोडलं; म्हणाले...

Web Title: Bilkis Bano Case Question To Bjp From The Samana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..