Bilkis Bano Case: "काहीतरी चुकतंय"; आरोपींच्या सत्कारानंतर जावेद अख्तर संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Javed Akhtar Bilkis Bano
Bilkis Bano Case: "काहीतरी चुकतंय"; आरोपींच्या सत्कारानंतर जावेद अख्तर संतप्त

Bilkis Bano Case: "काहीतरी चुकतंय"; आरोपींच्या सत्कारानंतर जावेद अख्तर संतप्त

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ जणांची सुटका झाली आहे. त्यावरुन आता देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादात आता जावेद अख्तर यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Bilkis Bano Rape Case)

हेही वाचा: Bilkis Bano: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका, काय आहे 'हे' प्रकरण?

गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी ट्वीट करत या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये जावेद अख्तर म्हणतात, "५ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांची हत्या करणाऱ्यांची तुरुंगातून सुटका होते. त्यांना मिठाई भरवली जाते, पुष्पहार घातला जातो. दुर्लक्ष करु नका, विचार करा.आपल्या समाजात काहीतरी गंभीर चूक होत आहे.

हेही वाचा: मला शांततेने अन् न घाबरता जगण्याचा हक्क परत द्या: बिल्किस बानो

काय आहे हे प्रकरण?

२००२ साली गुजरात दंगलीच्या वेळी घडलेल्या सर्वात भयंकर प्रकरणांपैकी बिल्किस बानो प्रकरण हे एक. दंगलीच्या वेळी पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या १८ - १९ वर्षांच्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांच्या तीन वर्षांच्या लहान मुलीला त्यांच्या डोळ्यादेखत जमिनीवर आपटून तिची हत्या करण्यात आली. तसंच बानो यांची आई, दोन दिवसांची बाळंतीण असलेली बहीण यांच्यासह १४ नातेवाईकांचा जमावाने जीव घेतला. या सगळ्या प्रकारामुळे बिल्किस बेशुद्ध पडल्या. त्या मेल्या आहेत, असा जमावाचा समज झाला. त्यामुळे संतप्त जमाव निघून गेला, त्यामुळं बिल्किस वाचल्या.

टॅग्स :Gujarat