esakal | मोदींसोबत शाहीनबागच्या 'दादी'देखील आहेत 'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत
sakal

बोलून बातमी शोधा

Bilkis dadi

अभिनेता आयुष्यमान खुराना, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि शाहीन बागमधील आंदोलनातून प्रसिद्धीस आलेली बिलकिस दादी यांचाही टाइमच्या यादीत समावेश आहे... 

मोदींसोबत शाहीनबागच्या 'दादी'देखील आहेत 'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जगातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या 'टाइम' या आंतराराष्ट्रीय मॅक्झीनने या वर्षीच्या जगातील सर्वांत प्रभावशाली अशा 100 लोकांची यादी जाहिर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्थान देण्यात आलं आहे. मात्र, या यादीत भारतातील फक्त मोदींचंच नाव नाहीये. तर मोदींच्या व्यतिरीक्तही अनेकांची नावे या यादीत आहेत. यामध्ये अभिनेता आयुष्यमान खुराना, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि शाहीन बागमधील आंदोलनातून प्रसिद्धीस आलेली बिलकिस दादी यांचाही समावेश आहे. 

हेही वाचा - कांदा, बटाटा जीवनावश्यक नाही; दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

यातील खास गोष्ट हीच आहे की, टाइम मॅक्झीनने शाहीन बागमधील आंदोलनात 'दादी' या नावानी प्रसिद्ध झालेल्या बिलकीस यांनाही जगातील सर्वात प्रभावी 100 लोकांमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. 82 वर्षीय दादी बिलकिस या सुधारित नागरिकत्व कायद्याविराधातील आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. दिल्लीमधील शाहीन बाग परिसरात झालेल्या मोठ्या धरणे आंदोलनात बसून त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील निषेधाचा चेहरा म्हणून बिलकिस यांची ओळख तयार झाली आहे. बिलकिस या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या आहेत. त्यांचे पती जवळपास दहा-बारा वर्षांपूर्वीच मरण पावले आहेत. सध्या बिलकिस या आपल्या कुंटूबासमवेत दिल्लीत राहतात. 

हेही वाचा - काँग्रेसने कष्टाने मिळवलेले मित्र मोदींनी तोडले - राहुल गांधी

टाइम मॅक्झीनने मागील वर्षी लंडनमधील एका रुग्णाला एचआयव्हीपासून मुक्त करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या प्रोफेसर रविंद्र गुप्ता यांचाही समावेश या यादीत केला होता. लंडनमधील हा रुग्ण जगातील केवळ दुसरा रुग्ण आहे जो एचआयव्हीपासून मुक्त झाला आहे. याव्यतिरिक्त टाइमने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचाही समावेश या यादीत केला आहे.