बिल गेट्‌स होणार सासरेबुवा; मुलीचा झाला साखरपुडा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांची कन्या जेनिफर गेट्‌स ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इजिप्तचा कोट्यधीश घोडेस्वार नाएल नासर याच्याबरोबर तिचा साखरपुडा झाला आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे.

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांची कन्या जेनिफर गेट्‌स ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इजिप्तचा कोट्यधीश घोडेस्वार नाएल नासर याच्याबरोबर तिचा साखरपुडा झाला आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेनिफरने गुरुवारी (ता. 30) इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, की नाएल नासर तू सर्वांपेक्षा वेगळा आहेस. तू मला प्रपोज केल्याने माझ्या पायाखालील जमीनच सरकली आहे. उर्वरित आयुष्य तुझ्या साथीने जगण्यासाठी मी आता खूप काळ वाट पाहू शकत नाही. नासरनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. "तिने होकार दिला आहे. मी आता जगातील सर्वांत भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असल्याचे मला वाटू लागले आहे. जेन, तू माझ्यासाठी सर्वकाही आहे, ज्याची मी केवळ कल्पनाच करू शकतो,'' अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. जेनिफर आणि नासर हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात एकत्र शिकत होते. तेथे त्यांच्यात प्रेमाचे धागे विणले गेले. ते दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत होते.

कोरेगाव पार्कचे नाव राहणार कायम; 'हे' नाव करण्याचा होता प्रस्ताव

बिल गेट्‌स यांच्या तीन मुलांमध्ये जेनिफर ही सर्वांत मोठी आहे. तिच्या नावावर 110 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तिचा भावी पती नाएल नासर याचा जन्म इजिप्तमध्ये झाला असून, त्यांचे पालनपोषण कुवेतमध्ये झाले आहे. तो कुशल घोडेस्वार आहे. 2020च्या ऑलिंपिकमध्ये इजिप्तचा समावेश होण्यास त्याची मदत झाली आहे. 60 वर्षांच्या खंडानंतर इजिप्त या वर्षी ऑलिंपिकमध्ये दिसणार आहे. जेनिफरलाही घोडेस्वारीची आवड असून तिने व्यावसायिक स्पर्धांमधून भाग घेतला होता, असे सांगण्यात आले.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

मेलिंडा गेट्‌सकडून अभिनंदन
जेनिफर आणि नासर यांच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर तिची आई मेलिंडा गेट्‌स यांनी सोशल मीडियावरून त्यांचे अभिनंदन केले आहे. "तुला आणि नासरला खूप खूप शुभेच्छा', असे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billionaire Bill Gates’ daughter to marry Muslim millionaire