esakal | अब्जाधिशांच्या परदेशी मालमत्ता ICIJ कडून उघड; भारतातीयांचाही समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

अब्जाधिशांच्या परदेशी मालमत्ता ICIJ कडून उघड; भारतातीयांचाही समावेश

अब्जाधिशांच्या परदेशी मालमत्ता ICIJ कडून उघड; भारतातीयांचाही समावेश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गर्भश्रीमंत भारतीयांच्या तसेच मातब्बर जागतिक नेत्यांच्या जगभर पसरलेल्या मालमत्ता आयसीआयजे ने उघड केल्या असून, अनिल अंबानी, विनोद अदाणी, जॅकी श्रॉफ, किरण मजूमदार शॉ, निरा राडिया, सचिन तेंडुलकर, सतीश शर्मा आदींचा या यादीत समावेश आहे. अर्थात यापैकी बहुसंख्य मान्यवरांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) तर्फे या मालमत्ताधारकांची यादी मिळविण्यात आली आहे. विशेषतः जे देश करचुकवेगिरीला आश्रय देतात या देशांमध्ये या मालमत्ता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या यादीत तीनशे भारतीय तसेच अन्य 91 देशांमधील राजकीय नेते व लोकप्रिय व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा: पुढील चार तास पुण्यासह 'या' ठिकाणी होणार कोसळधार

ऑक्सफॅम इंडिया ने याप्रकरणी तत्काळ कारवाईची तसेच करचुकवेगिरीला आश्रय देणारे व्यवहार मोडून काढण्याची मागणी केली आहे. या व्यवहारांमुळे जगातील सर्वच देशांचा मिळून दरवर्षी 427 अब्ज अमेरिकी डॉलरचा करमहसूल बुडत असल्याचा अंदाज आहे. याचा फटका अर्थातच गरीब आणि विकसनशील देशांना सर्वात जास्त बसतो. त्यामुळे भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांनाही प्रोत्साहन मिळते. ही व्यवस्था मोडून काढल्यास सरकारला सामाजिक योजनांसाठी अमूल्य असा निधी मिळेल, असेही ऑक्सफॅमचे म्हणणे आहे.

आपल्या पतीचा परदेशातील ट्रस्ट वैध असल्याचे स्पष्टीकरण बायोकॉनच्या अध्यक्ष श्रीमती किरण मजूमदार शॉ यांनी दिले आहे. त्या वृत्तात आरोप असला तरी कोणीही भारतीय त्या ट्रस्टचा कारभार पहात नाही, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: MPSC 2021 ची निघाली जाहिरात; अशा आहेत तारखा

आयसीआयजे ने या अवैध मालमत्तांसंदर्भात चौदा कंपन्यांमधून सव्वा कोटी कागदपत्रे मिळविल्याचा दावा केला आहे. या यादीत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पॉपस्टार शाकिरा यांचीही नावे असून त्या दोघांनीदेखील या आरोपांचा इन्कार केला आहे. आपली सर्व गुंतवणुक वैध असून ती करवसुली यंत्रणांसमोर यापूर्वीच उघड करण्यात आल्याचे तेंडुलकर च्या वकिलाने सांगितले.

जॉर्डनचे राजे, केनिया, इक्वेडोर व युक्रेनचे अध्यक्ष, झेक रिपब्लिकचे पंतप्रधान तसेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा समावेश आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व रशिया, अमेरिका आणि तुर्कस्तान मधील एकशेतीस अब्जाधिशांच्या व्यवहारांचाही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे.

loading image
go to top