
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला असून राज्य सरकारने मयूर विहार, द्वारका या भागातील प्रत्येकी चार प्रमाणे सॅम्पल गोळा करुन लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर देशात आता बर्ड फ्लूची (Bird Flu) लाट उसळण्याची भीती निर्माण झाले आहे. देशातील सहा राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली असून राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये पक्षांचे सॅम्पल टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळ या राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली होती. मध्य प्रदेश आणि केरळमधून अन्य राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला असून राज्य सरकारने मयूर विहार, द्वारका या भागातील प्रत्येकी चार प्रमाणे सॅम्पल गोळा करुन लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत मयूर विहार फेज 3 परिसरातील पार्कमध्ये आतापर्यंत जवळपास 200 मृत कावळे आढळल्यानंतर बर्ड फ्लूची चाचपणीला वेग आला आहे. ओखला बर्ड सेंक्चुरीमध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हरियानात दीड लाख कोंबड्या मारणार; बर्ड फ्लूचा फैलाव रोखणार
Bird Flu: 35 crows found dead in Delhi, samples collected for testing
Read @ANI Story | https://t.co/bEv9tYKtST pic.twitter.com/mqk8F4WEv8
— ANI Digital (@ani_digital) January 9, 2021
निरीक्षणासाठी याठिकाणी रॅपिड रिस्पॉन्स टीम देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये मागील चार दिवसांत जवळपास 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता कोरोनानंतर बर्ड फ्लूची भीती निर्माण झाली आहे. अद्याप दिल्ली सरकारने राज्यात बर्ड फ्लूची केस सापडल्याची कोणतीही पुष्टी अद्याप केलेली नाही.