Akasa Air : 19 हजार फूट उंचीवर पक्ष्यानं दिली विमानाला धडक; पक्ष्याचं रक्त दिसताच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akasa Airlines

Akasa Air च्या विमानाला पक्ष्यानं धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

Akasa Air : 19 हजार फूट उंचीवर पक्ष्यानं दिली विमानाला धडक; पक्ष्याचं रक्त दिसताच..

अहमदाबाहून दिल्लीला निघालेल्या Akasa Air च्या विमानाला पक्ष्यानं धडक दिल्याची घटना समोर आलीय. पक्ष्यानं धडक दिल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर उतरलं. यानंतर विमानाचं काही नुकसान झालं आहे का याची पाहणी करण्यात आली.

नुकत्याच लाँच केलेल्या बजेट एअरलाइन ‘Akasa Air’द्वारे चालवल्या जाणार्‍या बोईंग 737 मॅक्स 8 विमानाला 1900 फूट उंचीवर पक्षी आदळल्यामुळं रेडोमचं नुकसान झालं. अकासाचं विमान लँड झाल्यानंतर त्याच्या नाकाच्या बाजूला नुकसान झाल्याचं लक्षात आलं. विमान 19 हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना पक्ष्यानं धडक दिल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. फोटोमध्ये विमानाच्या पुढील बाजूला पक्ष्याचं रक्त लागल्याचं दिसत आहे.

हेही वाचा: Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? मिस्टर अॅण्ड मिसेस वानखेडेंची 'ही' जाहिरात चर्चेत!

डीजीसीएनं दिलेल्या माहितीनुसार, 'QP-1333 या विमानाला पक्ष्यानं धडक दिली. हे विमान अहमदाबाद ते दिल्ली दरम्यान उड्डाण करतं. नुकसानग्रस्त झालेलं मॅक्स कंपनीचं B-737-8 विमान आहे.' अकासा एअरलाइन्सला याआधीही अशा घटनांचा सामना करावा लागला आहे. 15 ऑक्टोबरला एका विमानाला उड्डाण केल्यानंतर पुन्हा माघारी परतावं लागलं होतं. विमानाच्या केबिनमध्ये काही तरी जळत असल्याचं दुर्गंध आल्यानंतर विमान माघारी परतलं होतं. हे विमान मुंबईहून बंगळुरुला चाललं होतं.

टॅग्स :delhibirdairlines