धमाल सेलिब्रेशन! पत्नीचा वाढदिवस अन् केजरीवालांची हॅटट्रीक!

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

आजचा दिवसच केजरीवालांसाठी खास आहे, कारण आज त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा वाढदिवस आहे. आपच्या दिल्लीतील मुख्यालयात केक कापून सुनिता यांचा वाढदिवस व आपच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 नवी दिल्ली : दिल्लीकरांनी विधानसभा निवडणूकीत आप व अरविंद केजरीवालांच्या बाजून कौल दिला आहे. दुपारपर्यंतच्या मतमोजणी टप्प्यात दिल्लीकरांनी आपला तब्बल ५८ जागांवर आघाडीवर ठेवलंय. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार. आजचा दिवसच केजरीवालांसाठी खास आहे, कारण आज त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा वाढदिवस आहे. आपच्या दिल्लीतील मुख्यालयात केक कापून सुनिता यांचा वाढदिवस व आपच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी त्यांची मुलं व आपचे नेते उपस्थित होते.

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत तिसऱ्यांदा बहुमत मिळवत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार बनत सुनिता यांना स्पेशल बर्थडे गिफ्ट दिलंय. आजचा योगायोग अगदीच स्पेशल आहे. आजच आपला भरघोस यश मिळतंय आणि सुनिताजींचा वाढदिवस आहे, त्यामुळे अरविंद केजरीवालांसाठी आजचा दिवस म्हणजे डबल सेलिब्रेशन आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनिता केजरीवाल या नेहमीच अरविंद यांच्या राजकीय वाटचालीत खंबीरपणे उभ्या असतात. याही निवडणूकीत रस्त्यावर उतरून, घरोघरी जात त्यांनी प्रचार केला होता. आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं व त्यांना वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट मिळालं आहे. सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday celebration of Sunita Arvind Kejriwal birthday