Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

Manmohan Singh
Manmohan Singh

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते डॉं. मनमोहन सिंह यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यात महत्वपूर्ण भुमिका त्यांनी निभावली आहे. देशात झालेल्या आर्थिक सुधारणांचे खरे सूत्रधार म्हणून मनमोहन सिंह ओळखले जातात. मनमोहन सिंग हे भारतातच नव्हे तर जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञामध्ये गणले जातात. यूपीए सत्तेवर असताना ते दोनवेळा भारताचे पंतप्रधानही राहिलेले आहेत. मनमोहन सिंह यांचा शांत आणि संयमी स्वभाव हा त्यांना इतर पंतप्रधानांहून वेगळा ठरवतो. त्यांनी पंतप्रधान व्हायच्या आधीच देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिली होती तसेच प्रगतीचा रस्ता दाखवला होता. याच कारणांमुळे त्यांना एक विद्वान अर्थतज्ञ म्हणूनच जास्त ओळखलं जातं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया. 

मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब प्रांतात म्हणजे आज पाकिस्तानात असणाऱ्या एका गावात झाला. 

राव सरकारमध्ये अर्थव्यवस्थेला दिशा दिली

मनमोहन सिंहांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. या दरम्यान अर्थसंकल्पाचं सादरीकरण करताना त्यांनी 1991-95 दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी आणि मजबूत अशी दिशा दिली. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. 

भारताचा विकासदर वाढवला 
1991 मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा प्रस्ताव मांडला. यामध्ये आर्थिक उदारीकरण, परदेशी गुंतवणूक कर सुधारणा यासह अनेक महत्वाच्या बदलांचा समावेश होता. याशिवाय स्वातंत्र्यापासून 1991 पर्यंत भारताचा विकास दर 4.34 टक्के होता. तोच विकास दर 1991 ते 2011 पर्यंत सरासरी 6.24 टक्के इतका झाला. तसंच 2015 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर त्यांनी वाढवला.

आरबीआयचे गव्हर्नर 
मनमोहन सिंह रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरदेखील राहिलेले आहेत. या कार्यकाळात 1991 मध्ये आर्थिक सुधारणांना एक दिशा देण्यासाठी त्यांनी मोठी पावले उचलली. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने गती पकडली होती. 

जागतिकीकरणाची सुरवात
अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना मनमोहन सिंह यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. खासकरुन असे निर्णय घेतले ज्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. यासोबतच त्यांनी भारताला जागतिक बाजारासाठी देखील खुलं केलं. यासोबतच देशात आर्थिक क्रांती आणि जागतिकीकरणाच्या प्रारंभासाठीगी मनमोहन सिंह यांनाच श्रेय दिलं जातं.

या क्षेत्रात महत्वपूर्ण घेतले

मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान बनल्यांनंतर रोजगाराच्या क्षेत्रात मनरेगाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक पाऊल उचललं. प्रत्येक हाताला रोजगार देण्याच्या त्यांच्या विचारामुळेच अनेकांच्या हाताला काम मिळालं. 

अमेरिकेसोबत अणु करार

मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानपदाच्या आपल्या कार्यकाळात 2006 मध्ये  भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्वाचा असा अणु करार केला. पंतप्रधान म्हणून एक मोठी आणि महत्वपूर्ण कामगिरी या दृष्टीने या करारकडे बघितलं जातं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com