बिर्याणीसाठी तब्बल दीड किलोमीटरची रांग! 

biryani
biryani

बंगळुरू: आजकाल आपल्या आजूबाजूला बरीच खाण्यापिण्याची चर्चा होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये बाबांच्या ढाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बाबांचा डोळ्यांतील अश्रू पाहून बऱ्याच लोकांची त्यांच्या स्टॉलवर खाण्याासाठी एकच रिघ सुरु केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अशा स्थानिक ढाब्यांना मदत करण्यासाठी 'बाबा का ढाबा' ही मोहीम सुरु केली होती.

कर्नाटकातील होस्कोटेमध्ये असाच एक स्थानिक बिर्याणी चा स्टॉल आहे, जो इतर कारणांमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. बिर्याणीच्या या छोट्याशा स्टॉलला दररोज दीड किलोमीटर लांबीची रांग लागते आणि बिर्याणी मिळण्यासाठी रांगेत दोन-तीन तास वाट पाहावी लागत आहे.

कर्नाटकातील होस्कोटे येथील बिर्याणीच्या स्थानिक लोकांमध्ये हे अतिशय प्रसिद्ध आहे. ग्राहक सांगतात, "बिर्याणी खूपच चविष्ट आहे त्यामुळे याच्यासाठी आम्ही कितीही वाट पाहू शकतो." या स्टॉलच्या बाहेर लागलेल्या रांगेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरस आणि प्रसिध्द होत आहे. 

दररोज हजारो किलो बिर्याणी विकली जातेय-
याबद्दल स्टॉलच्या मालकाने सांगितले की त्यांनी 22 वर्षांपुर्वी हा स्टॉल सुरु केला होता. तसेच स्टॉलचालक पुढे बोलताना म्हणाले की "आम्ही आमच्या बिर्याणीत कोणत्याही प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह टाकत नाही तसेच एका दिवसात एक हजार किलोपेक्षा जास्त बिर्याणीही बनवत नाही."

बिर्याणीसाठी रांगच रांग-
बिर्याणीसाठी दररोज दुकानासमोर खूप लांबच लांब रांगा लागत आहेत. एका ग्राहकाने सांगितले की, तो पहाटे 4 वाजता बिर्याणी घेण्यासाठी रांगेत उभा होता आणि त्याला तब्बल दीड तासाने म्हणजे साडेसहा वाजता त्याची ऑर्डर मिळाली. कारण बिर्याणीसाठी सुमारे दीड किलोमीटरची रांग होती. ही बिर्याणी इतकी चविष्ट आहे की त्याची कितीही वेळ आम्ही याची वाट पाहू शकतो, असं ग्राहकांनी सांगितले

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com