esakal | रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्कारावेळी चिराग बेशुद्ध पडले 
sakal

बोलून बातमी शोधा

ram vilas paswan funeral chirag paswan fainted

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, गुरुवारी रात्री दिल्लीत रामविलास पासवान यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून, त्यांना ओळखलं जात होतं.

रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्कारावेळी चिराग बेशुद्ध पडले 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा Bihar : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यांना शनिवारी पाटणा येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  भावपूर्ण निरोप देण्यात आला. दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते. पण, त्यांच्यावर बिहारच्या मातीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याचे चिरंजीव चिराग पासवान मुखाग्नी देताना बेशुद्ध पडले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, गुरुवारी रात्री दिल्लीत रामविलास पासवान यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून, त्यांना ओळखलं जात होतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. निधनानंतर दिल्लीत त्यांचे पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह दिल्लीतील बड्या नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होतो. पाटणा येथे अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह, रविशंकर प्रसाद आदी प्रमुख नेते उपस्थित होते. 

आणखी वाचा - बिहार निवडणूक : गळ्यात गळे, हातात हात चालणार नाही

भारतरत्न देण्याची मागणी 
पाटणा येथील श्रीकृष्णपुरी परिसरातील पासवान यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे पासवान यांची अंत्ययात्रा निघण्यास उशीर झाला. दरम्यान, नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री प्रेम कुमार यांनी पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.