बिशप फ्रँकोंना पोलिसांची नोटीस 

बिशप फ्रँकोंना पोलिसांची नोटीस 

तिरुअनंतपुरम : बलात्काराचा आरोप असलेले जालंधरचे बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना केरळ पोलिसांनी नोटीस पाठविली असून, 19 सप्टेंबर रोजी कोट्टयम पोलिस अधीक्षकांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. एर्नाकुलमचे पोलिस महानिरीक्षक विजय साखरे यांनी आज ही माहिती दिली.

बिशप फ्रॅंको यांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप एका ननने केला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे पोलिसांनी नोंदविले असून, त्यात विरोधाभास आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानुसार याप्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असेही साखरे यांनी सांगितले. सखोल चौकशीनंतर या प्रकरणी खरी परिस्थिती समोर येईल. बलात्काराचा आरोप केलेली नन आणि साक्षीदारांना न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षण पुरविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

याप्रकरणी केरळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अनेक नन्स सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाला महिलांच्या हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते, चित्रपट कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला एर्नाकुलममध्ये सलग सहाव्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. बिशप मुलक्कल यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत इतरही काही नन्सनी केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com