बिटकॉईनवरून काँग्रेसचे राजकारण : बोम्मई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसवराज बोम्मई

बिटकॉईनवरून काँग्रेसचे राजकारण : बोम्मई

बंगळूर : कथित बिटकॉईन गैरव्यवहारावरून काँग्रेस राजकारण करीत असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. याप्रकरणी पुरावे असल्यास विरोधी पक्षांनी ते चौकशी संस्थांना द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. बिटकॉईन प्रकरणावरून छेडले असता, हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारा, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की पुरावे असतील तर ते सक्तवसुली संचालनालय किंवा पोलिसांना द्यावेत, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल ,असे मी म्हणालो आहे. यात काही तथ्य असल्यास चौकशी केली जाईल.

बंगळूरमधील एका हॅकरकडून केंद्रीय गुन्हे नऊ कोटी रुपये मूल्य असलेली बिटकॉईन जप्त केली. श्रीकृष्ण ऊर्फ श्रीकी असे त्याचे नाव आहे. सरकारी संकेतस्थळे हॅक करणे, इंटरनेटच्या माध्यमातून काळा बाजार करून अंमली पदार्थांचा व्यवहार करणे आणि त्यासाठी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रक्कम देणे असेही आरोप त्याच्यावर आहेत.

हेही वाचा: सासवड रेल्वेस्थानक हे नाव बदलून 'काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक' असे नामकरण

सत्ताधारी नेते, कुटुंबीयांवर आरोप

या प्रकरणात सत्ताधारी भाजपचे वरिष्ठ नेते, त्यांचे कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सरकार हे प्रकरण दाबत असल्याचाही दावा केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेतेही यात सामील असल्याचे प्रत्यूत्तर भाजपने दिले आहे.

loading image
go to top