Pune: सासवड रेल्वेस्थानक हे नाव बदलून 'काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक' असे नामकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड रेल्वेस्थानक हे नाव बदलून 'काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक' असे नामकरण

सासवड रेल्वेस्थानक हे नाव बदलून 'काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक' असे नामकरण

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : पुणे मिरज एक्सप्रेस रेल्वे लाईनवरील काळेपडळ येथील रेल्वेस्थानकाचे सासवड रेल्वेस्थानक हे नाव बदलून "काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक' असे नामकरण करण्यात आले आहे. माजी आमदार योगेश टिळेकर व कार्यकर्ते योगेश सुर्यवंशी यांनी त्याबाबत पाठपुरावा केला होता. पुणे रेल्वे डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनी आज त्याबाबत टिळेकर यांना माहिती दिली.

हडपसर जवळील काळेबोराटेनगर हद्दीत हे स्थानक येत असतानाही त्याला सासवड रेल्वेस्थानक असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करून स्थानकाला काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक असे नाव असण्याची भावना व्यक्त केली होती. माजी आमदार टिळेकर यांनी स्थानकाचे नाव बदलावे अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्याचा पाठपुरावाही त्यांनी वेळोवेळी केला होता. पुणे रेल्वे डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनाही तसे निवेदन दिले होते.

हेही वाचा: भुकेचा प्रश्न सोडवणे हे आव्हान - विश्व सायकल यात्री सोनवणे

आज रेल्वे अधिकाऱ्यांनी टिळेकर व सुर्यवंशी यांना रेल्वेस्थानकाचे नाव बदलून काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक असे नामकरण केले असल्याची माहिती दिली. थोडयाच दिवसात तेथे त्याबाबतचे फलक लावण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top