भुवनेश्वर: पटनागड येथील नव्याने निवडूण आलेले बीजू जनता दलचे (बीजेडी) आमदार सरोज कुमार मेहेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला भर रस्त्यात शंभर उठा बशा काढायला लावल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बोलांगीर जिल्ह्यातील मंडल-बेलपाडा बायपास रस्त्याचे काम अत्यंत कनिष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत नागरिकांनी त्या मतदारसंघाचे आमदार सरोज मेहर यांच्याकडे तक्रार केली होती. मेहर यांनी कामामध्ये सुधारणा करण्यास सांगितले होते. परंतु, तरीही कामामध्ये सुधारणा झाली नव्हती. कामाची चौकशी करण्यासाठी मेहेर हे बेलपाडा येथे गेले होते. यावेळी त्यांना कनिष्ठ दर्जाचे काम दिसून आले. यामुळे मेहर यांनी अभियंताची कानउघाडनी करत भर रस्त्यातच 100 उठाबशा काढायला लावल्या.
अभियंता उठाबशा काढत असताना नागरिकांनी मोबाईलमधून व्हिडिओ काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला. राज्यामध्ये व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यावर व्यक्तही होत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.