भाजपच्या मोर्चाला हिंसक वळण

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

शबलीमलाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने सोमवारी सचिवालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्या वेळी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसप्रणीत यूडीएफने विधानसभेवर मोर्चा काढला होता.

तिरुअनंतपुरम : शबलीमलाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने सोमवारी सचिवालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्या वेळी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसप्रणीत यूडीएफने विधानसभेवर मोर्चा काढला होता.

भाजप आणि कॉंग्रेसने काढलेल्या स्वतंत्र्य मोर्चाद्वारे राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारने शबलीमला परिसरासंदर्भातील आपला आदेश मागे घ्यावा आणि आपल्या नेत्यांचे उपोषण मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सचिवालयाच्या बाहेर दगडफेक आणि खुर्च्यांची फेकाफेक केली.

Web Title: BJP’s relay hunger strike outside the Secretariat on the Sabarimala issue.