कुमारस्वामींनी लाच मागितल्याचा भाजपकडून आरोप

कुमारस्वामींनी लाच मागितल्याचा भाजपकडून आरोप

बंगळूर : धजदच्या एका आमदाराला वश करून घेण्यासाठी भाजपकडून आमिष दाखवल्याची ध्वनिफीत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी उघड केली होती. त्यामुळे संतापलेले भाजप नेते आता थेट कुमारस्वामी यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. विधान परिषदेचे सदस्य बनविण्यासाठी कुमारस्वामी यांनी 25 कोटींची मागणी केल्याची ध्वनी व चित्रफीत आपल्याकडे असून, सोमवारी (ता. 10) ती विधानसभेच्या सभाध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते आमदार अरविंद लिंबावळी यांनी सांगितले. 

विजापूरचे विजूगौड यांना विधान परिषद सदस्य बनविण्यासाठी कुमारस्वामी यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा यापूर्वीही आरोप केला होता. आता हाच विषय भाजपने पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. सोमवारी विधानसभेत हा विषय उपस्थित करून, सभाध्यक्षांकडे चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे लिंबावळी यांनी स्पष्ट केले. येडियुरप्पांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कुमारस्वामी यांनी 25 कोटींची लाच मागितल्याची चित्रफीत आपल्याजवळ आहे. चित्रफीत पाहिल्यानंतर कोणी कोणाकडे लाच मागितली हे स्पष्ट होईल, असे लिंबावळी म्हणाले. कुमारस्वामी यांनी जाहीर केलेल्या ध्वनिफितीमधील आवाज येडियुरप्पांचा नाही, असा दावाही त्यांनी केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com