मायावतींनी कोर्टात जाण्याआधी दवाखान्यात जावे- भाजप 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

काळा दिवस पाळणार

न्यायालयात जाण्याशिवाय बसपच्या वतीने प्रत्येक महिन्यात एक काळा दिवस पाळला जाणार आहे. भाजपने लोकशाहीची हत्या केल्याच्या निषेधार्थ हा काळा दिवस पाळणार असल्याचे पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले.

लखनौ : मतदान यंत्रांमध्ये झालेल्या कथित फेरफार प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. 'त्यापेक्षा मायावती यांनी रुग्णालयात जावे,' असा सल्ला व्यक्त भाजपने दिला आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याने इतर पक्षांना फटका बसून भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

मायावती यांचा न्यायालयात जाण्याचा विचार आहे याकडे लक्ष वेधले असता भाजपचे नेते केशव प्रसाद मौर्य म्हणाले, "मायावती न्यायालयात गेल्या तर त्याची मी चिंता करीत नाही, परंतु त्याआधी त्यांनी एखाद्या रुग्णालयात जाऊन स्वतःवर चांगले उपचार करवून घ्यावेत. त्यांना विश्रांतीची (ब्रेक) गरज आहे."

काळा दिवस पाळणार

न्यायालयात जाण्याशिवाय बसपच्या वतीने प्रत्येक महिन्यात एक काळा दिवस पाळला जाणार आहे. भाजपने लोकशाहीची हत्या केल्याच्या निषेधार्थ हा काळा दिवस पाळणार असल्याचे पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले. पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. 
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची मागणी केजरीवाल यांनीही केली आहे. 
 

Web Title: bjp advises mayawati to visit a hospital