2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेत : गडकरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

''लोकशाहीत पराभव आणि विजय नम्रतापूर्वक स्वीकारायला हवा. कर्नाटकाच्या जनतेने योग्य कौल दिला. भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर येईल''.

- नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री 

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरवात झाली आहे. आता या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर असून, भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे दिसत असताना भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरु केले आहे.

''लोकशाहीत पराभव आणि विजय नम्रतापूर्वक स्वीकारायला हवा. कर्नाटकाच्या जनतेने योग्य कौल दिला. भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर येईल''.

- नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री 

''कर्नाटकातील जनतेला योग्य प्रशासनाची गरज आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपला निवडले आहे. हा विजय पक्षासाठी मोठा विजय आहे. काँग्रेसने आता हेही राज्य गमावले आहे".    

- प्रकाश जावडेकर, भाजपचे कर्नाटक प्रभारी

''कर्नाटकातील हा विजय एक ऐतिहासिक विजय आहे. मी कर्नाटकातील जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. आता देशात 'काँग्रेस खोजो' अभियान राबविण्यात येणार आहे. आता काँग्रेस कोठे असेल माहिती नाही''. 

- रमणसिंग, मुख्यमंत्री, छत्तीसगड

''कर्नाटकात भाजपचा झालेला विजय हा एक सामान्य विजय नाही. हा विजय लोकशाहीचा विजय आहे. या विजयानंतर कर्नाटकातील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  भारत आता 'काँग्रेसमुक्त भारता'च्या दिशेने चालत आहे''.

- शहानवाज हुसैन, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

''कर्नाटकात भाजपने विजय मिळवत राज्यात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपने नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे मी आमचे प्रेरणादायी नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करते". 

- वसुंधराराजे, मुख्यमंत्री, राजस्थान   

''कर्नाटकच्या विजयानंतर आता काँग्रेसला त्यांचे असलेले अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नाव बदलून काँग्रेस (पीएमपी) करण्याची वेळ आली आहे. कारण काँग्रेस फक्त पंजाब, मिझोराम आणि पुद्दुचेरी याच राज्यात सत्तेत आहे''.

- शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, छत्तीसगड 

''अमित शहा यांनी पुन्हा एकदा जादूई कामगिरी केली. त्यांनी दिवस रात्र, जिल्हा ते जिल्हा, बूथ ते बूथ मेहनत घेतली. त्यामुळे त्यांना सलाम. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कर्नाटकात ऐतिहासिक विजय प्राप्त केला''. 

-  स्मृती इराणी, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री

''कर्नाटकात भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक विजय आहे. या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना जात आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हा विजय खेचून आणता आला. या विजयाबद्दल कर्नाटकची जनता आणि मेहनती कार्यकर्त्यांचे अभिनंदन.

- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  

'' 'अबतक 23' या विजयानंतर कर्नाटक हे 23 वे राज्य ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे राज्य बनले आहे''. 

- रमणसिंग, भाजप नेते
 
 

Web Title: BJP again win under Modis leadership in 2019 says Nitin Gadkari