चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार

rohit pawar
rohit pawar

राजगुरुनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे आहे, म्हणून ते कोल्हापूर सोडून भाजपसाठी अतिशय अवघड असलेल्या कोथरूडसारख्या मतदारसंघात उभे राहिले, अशी उपहासात्मक टीका आमदार रोहित पवार यांनी येथे केली. 

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वाकी (  ता. खेड ) येथील राजरत्न हॉटेलमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, 'भाजप शासित केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. महाराष्ट्राचा २८ हजार कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला दिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये २००८ सालानंतरच्या मंदीच्या परिस्थितीतही १ लाख १० हजार कोटींची गुंतवणूक तेव्हाच्या युपीए सरकार मार्फत आली होती तर २०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात फक्त ६६ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.' 

आमदार मोहिते म्हणाले, ' पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कक्षेत येणारे, खेड तालुक्यातील महाळुंगे हे पोलीस ठाणे बेकायदेशीर आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी करुनही, ती होत नाही.  त्याठिकाणचे अधिकारी कंपन्यांच्या स्क्रॅप, लेबर, सिक्युरिटी, ट्रान्सपोर्ट इत्यादी ठेक्यांमध्ये भागीदार असतात. तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यकारी संचालकही या ठेक्यांमध्ये भागीदार असतात. त्यामुळे स्थानिक माणसाला न्याय मिळत नाही. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अधिकारी खेड तालुक्याला सन्मानाची वागणूक देत नाहीत. एमआयडीसीतून फक्त हफ्ते गोळा करायचं काम करतात. म्हणून त्या आयुक्तालयाला जोडलेली गावे पुन्हा पुणे ग्रामीणला जोडावीत.' 

पिंपरी चिंचवडला भामाआसखेडचे थेंबभरही पाणी देणार नाही, याचा मोहिते यांनी पुनरुच्चार केला. तसेच चासकमानचे बरेचसे पाणी पीएमारडीए आणि सेझ साठी आरक्षित झाल्याने कळमोडीचे पाणीही कोणाला देता येणार नाही असे ते म्हणाले. 

यावेळी निर्मला पानसरे, कैलास सांडभोर, राम गावडे, विजय डोळस, संध्या जाधव, गणेश सांडभोर, मनीषा टाकळकर, बी के कदम  आदींची भाषणे झाली. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. चौकट :- आमदार दिलीप मोहिते :- तालुक्यातील जनतेसाठी आमच्या काही मागण्या आहेत. काही चौकशा व्हाव्यात अशी मागणी आहे. त्याबाबतीत पत्रे दिली, सभागृहात मांडल्या, जाहीर बोललो तरी काही झाले नाही. आदरणीय शरद पवारांचे तुम्ही लाडके नातू आहात, म्हणून आमच्या मागण्या तुम्ही साहेबांपुढे मांडल्यास मान्य होतील, असे आम्हाला वाटते. 

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com