'निरहुआ'वर भाजपचा पुन्हा “सबका विश्वास”

आझमगढ मधून पुन्हा तिकीट, नक्वींचा पत्ता कट ?
BJP announced list of candidates for Lok Sabha and Assembly by-elections  Azamgarh and Rampur in Uttar Pradesh Dinesh Lal Yadav Mukhtar Abbas Naqvi
BJP announced list of candidates for Lok Sabha and Assembly by-elections Azamgarh and Rampur in Uttar Pradesh Dinesh Lal Yadav Mukhtar Abbas Naqvisakal

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादी आज दुपारी जाहीर केली. यात उत्तर प्रदेशातील आजमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुक उमेदवारांचा समावेश आहे. आजमगड मधून अखिलेश यादव यांच्याविरुद्ध यापूर्वी पराभूत झालेले बिहारी गायक आणि अभिनेते दिनेशलाल यादव ‘निरहुआ' यांना भाजप नेतृत्वाने पुन्हा तिकीट दिले आहे. मात्र केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांचा या यादीतही समावेश नाही. त्यामुळे त्यांना राज्यसभा अध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती बनवून 2024 मधील संभाव्य विजयी हॅटट्रिकच्या आधी पूर्वी जागतिक पातळीवरही एक मोठा “मेसेज” देण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

नकवी, सय्यद जाफर इस्लाम आणि एम.जे अकबर हे राज्यसभेत नसल्याने आता भाजपतर्फे संसदेत एकही मुस्लिम खासदार नाही. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात याचे वर्णन “काँग्रेस मुक्त भारत आणि मुस्लिम मुक्त संसद”, असे करण्यात येते! दरम्यान त्रिपुरा टाउन बोरदोवली विधानसभा मतदारसंघात भाजपने डॉ. माणिक शाह यांना उमेदवारी दिली आहे. 5 राज्यातील 9 विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूकांसाठी भाजपने आज उमेदवार जाहीर केले.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेशच्या आज़मगढ़ लोकसभा मतदार संघात भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने (जेपी नड्डा नव्हे) दिनेशलाल यादव ‘निरहुआ” यांच्यावर पुन्हा एकदा डाव लावला आहे. हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यांना संसदेवर आणण्याची परंपरा प्रमोद महाजन व लालकृष्ण आडवाणी यांच्या काळात भाजपमध्ये सुरू झाली. शत्रुघ्न सिन्हा हे या यादीतील पहिले नाव. सध्या रवीकिशन, मनोज तिवारी यासारखे लोकप्रिय भोजपुरी अभिनेते- गायक भाजपचे खासदार आहेत. मात्र निरहुआ यांचा नव्या पिढी वरील “जलवा” त्यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. निरहुआ यांना सपा नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वी याच आजमगड मतदारसंघात अस्मान दाखवले होते. अखिलेश आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर गेल्याने या रिक्त जागेवर पोट यनिवडणूक होणार आहे तेथून भाजपने पुन्हा

निरहुआ यांना तिकीट दिले आहे. या जागेवर अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव या सपातर्फे उभ्या राहतील अशी शक्यता आहे. म्हणजेच आता पुन्हा निरहुआ यांचा मुकाबला अखिलेश यादव यांच्याशीच होणार आहे. उत्तर प्रदेशातील दुसऱ्या बहुचर्चित रामपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने घनश्याम लोधी यांना मैदानात उतरवले आहे. रामपूर हा मुक्तार अब्बास नक्वी यांचा पारंपरिक मतदार संघ आहे. त्यामुळे राज्यसभेवर त्यांना तिकीट न दिल्यानंतर रामपुर मधून लोकसभेसाठी उतरवेल अशी भाजप वर्तुळातील ”कुजबुज” होती. प्रत्यक्षात भाजपने रामपूरमधूनही हिंदू उमेदवारच उभा केल्याने आता भाजप बाकांवर एकही मुस्लिम खासदार लोकसभेवर किंवा राज्यसभेवर दिसणार नाही याची दक्षता भाजप नेतृत्वाने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील गुप्तता भाजप नेतृत्वाने कायम ठेवली आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्या जागेवर मुस्लिम चेहरा आणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'मतपेढीच्या” राजकारणाला ठोस प्रत्युत्तर देण्याची भाजप नेतृत्वाची योजना असू शकते. अमेरिकन काॅंग्रेसला सादर झालेल्या व मुस्लिम अत्याचारांबाबत आरसा दाखवणार्‍या अहवालावर भारताने कालच जोरदार आक्षेप घेतला आहे. मात्र 4 पैकी एका सर्वोच्च घटनात्मक पदावर अल्पसंख्यांक व्यक्ती असणे हे भारतातच घडू शकते हा मेसेज यानिमित्ताने भारताच्या शत्रूंना जाईल. त्यादृष्टीने नक्वी आणि केरळचे राज्यपाल अरीफ महंमद खान अरीफ महंमद खान यांची नावे संभाव्य उपराष्ट्रपती पदासाठी सध्या चर्चेत आहेत. भाजप पक्षसंघटना हा विचार केला तर मुक्तार अब्बास नक्वी यांचे पारडे सहाजिकच जड आहे.मात्र अंतीम निर्णय हा एकच व्यक्ती घेणार असल्याने हाही राजकीय जाणकारांचा निव्वळ अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com