esakal | ममता दीदींचा गड उद्धवस्त करण्यासाठी भाजपनं आखलाय मास्टर प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal, West Bengal Assembly Elections, Bengal Elections, Bengal BJPAmit Shah, JP Nadda, West Bengal

भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह देशातील विविध भागातील 294 नेते पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. स्थानिक नेत्यांसोबत ते काम करतील. प्रत्येक मतदार संघात 45 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून बंगाल जिंकण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन आखला आहे.  

ममता दीदींचा गड उद्धवस्त करण्यासाठी भाजपनं आखलाय मास्टर प्लॅन

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह खुद्द मैदानात उतरले आहेत. बंगालमधील 294 पैकी 200 जागा जिंकण्याचा त्यांना विश्वास वाटतोय.  

भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह देशातील विविध भागातील 294 नेते पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. स्थानिक नेत्यांसोबत ते काम करतील. प्रत्येक मतदार संघात 45 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून बंगाल जिंकण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन आखला आहे.  

प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन होणार; सीबीएसईची निर्णय

दुसऱ्या राज्यातील नेते भाजपच्या पश्चिम बंगाल मोहिमेत 26 नोव्हेंबरला सामील होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री आणि अन्य राज्यातील दिग्गज मंत्री आणि नेत्यांचा यात समावेश असेल. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची सत्ता खालसा करुन आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस 2011 मध्ये सत्तेत आली. 2016 मध्ये  बंगालच्या जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. त्यांची सत्ता उलटून लावण्यासाठी भाजप गोटातील हालचालींना हळू हळू वेग होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा प्रत्येक महिन्याला पश्चिम बंगालचा दौरा करणे नियोजित आहे. 

loading image