Rahul Gandhi esakal
देश
Rahul Gandhi: "राहुल गांधींनी आता देशाविरोधातच युद्ध पुकारलंय", भाजपचा आरोप; पण विरोधीपक्ष नेते नेमकं काय म्हणालेत?
Rahul Gandhi Marathi News : महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रणाली गंभीर समस्या बनल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच सुमारे एक कोटी नवे मतदार अचानक निर्माण झाले असंही त्यांनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi Marathi News : देशातील प्रत्येक संस्थेवर भाजप-आरएसएसनं कब्जा केला आहे. त्यामुळं आमचा लढा आता भाजप-संघ आणि भारतीय स्टेट असा सुरु आहे, असं विधान लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या अर्थात 'इंदिरा भवन'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी भारतीय स्टेट हा शब्द प्रयोग केल्यानं त्यावरुन भाजपनं त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी आता भारताविरोधातच लढाईची घोषणा केली आहे, असा आरोप भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. तर तुम्ही हातात संविधानाची प्रत घेऊन का फिरता? असा सवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना विचारला आहे.