Goa Politics | महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकीय उलथापालथ; काँग्रेस शिवसेनेच्या वाटेवर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकीय उलथापालथ; काँग्रेस शिवसेनेच्या वाटेवर?

महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय खलबतांना वेग आलेला आहे. गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा आता तिथेही ऑपरेशन लोटस राबवत असल्याची चिन्हं दिसत आहेत. (Goa Congress News)

हेही वाचा: देशात ऑपरेशन लोटस? काँग्रेसने राज्यांची यादीच शेअर केली

गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला काँग्रेसचे १० आमदार भाजपात (Bhartiya Janata Party) सामील झाले होते. आज बरोबर तीन वर्षांनंतर याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी; कमलनाथांनी मंत्र्यांकडून मागवले राजीनामे

या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे आता आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत भाजपा ऑपरेशन लोटस (Operation Lotus BJP) राबवणार का या चर्चांना उधाण आलं आहे. आता गोव्यातल्या काँग्रेसची शिवसेना होणार का, याकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलेलं आहे.

Web Title: Bjp Congress Goa Pramod Sawant Congress Mlas Goa Politics Operation Lotus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..