'सिंह मोदींविरोधात कुत्रे-मांजर एकत्र येऊन उपयोग काय?'

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मोदींविरोधात एकत्र येणारे विरोधी पक्षाचे नेते हे कुत्रे-मांजर आहेत. बंगालला काँग्रेस वाचवू शकत नाही. काँग्रेस येथे ममता बॅनर्जींना विरोध करते आणि दिल्लीत जाऊन दूध-जिलेबी एकत्र खातात.

कोलकता - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक सिंह आहेत. या सिंहाविरोधात कुत्रे-मांजरांची फौज एकत्र आली तरी काही होऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे.

कोलकता येथ भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना विजयवर्गीय यांनी मोदींची तुलना सिंहाशी केली. त्यांच्याविरोधात लढणाऱ्यांना त्यांनी कुत्रा व मांजराची उपमा दिली. सिंहाविरोधात कितीही लढले तरी फायदा होत नाही, असा त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता. विजयवर्गीय यांनी यापूर्वीही अभिनेता शाहरुख खानची अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याच्यासोबत तुलना केली होती.

विजयवर्गीय म्हणाले, की मोदींविरोधात एकत्र येणारे विरोधी पक्षाचे नेते हे कुत्रे-मांजर आहेत. बंगालला काँग्रेस वाचवू शकत नाही. काँग्रेस येथे ममता बॅनर्जींना विरोध करते आणि दिल्लीत जाऊन दूध-जिलेबी एकत्र खातात. बंगालला वाचविण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

Web Title: BJP, Congress, Left Must Join Hands Against Trinamool In Bengal: Kailash Vijayvargiya