भाजप नगरसेवकाने मुस्लिम कुटुंबाला वाचविले हिंसक जमावापासून

भाजप नगरसेवकाने मुस्लिम कुटुंबाला वाचविले हिंसक जमावापासून

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली दंगलीमध्ये होरपळत असताना अनेक भागांमध्ये आणीबाणीच्या स्थितीतही माणुसकी जिवंत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाने हिंसक जमावाच्या तावडीतून एक मुस्लिम कुटुंब आणि त्यांचे घर जळण्यापासून वाचविले.

प्रमोद गुप्ता असे या नगरसेवकाचे नाव असून, ते यमुना विहार वॉर्डमधील भाजपचे नगरसेवक आहेत. गुप्ता हे सोमवारी रात्री शाहिद सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी सिद्दिकी यांचे घर पेटविणाऱ्या दीडशे जणांच्या जमावाला रोखले. नगरसेवक प्रमोद गुप्ता हे सिद्दिकी यांचे जुने मित्र आहेत. त्यांना याची माहिती कळताच त्यांनी सिद्दिकी यांच्या घराकडे धाव घेतली आणि या जमावाला पुढील नुकसान करण्यापासून रोखले. यामुळे सिद्दिकी आणि त्यांचे कुटुंब एका जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. त्यांच्या कुटुंबामध्ये एक-दोन महिन्यांचे बाळदेखील होते.

याबाबत बोलताना ते म्हणाले, “काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करत एक मोठा जमाव आमच्या घराजवळून जात होता. या जमावाने आमच्या घराच्या खाली असणाऱ्या एका बुटिकला आग लावली. हे बुटिक आमच्या भाडेकरूचे होते. तसेच या भाडेकरूंच्या कारची आणि दुचाकीचीदेखील या जमावाने तोडफोड केली. यामध्ये २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com