BJP Councillor Controversy
esakal
BJP Councillor Controversy : दिल्लीतील भाजपच्या एका नगरसेविकेने आफ्रिकन नागरिकाला हिंदी शिकण्याचा (Hindi language Row) इशारा दिल्याचा प्रकार सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पटपरगंज वॉर्ड क्रमांक १९७ मधील नगरसेविका रेणू चौधरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात त्या एका सार्वजनिक उद्यानात फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या परदेशी प्रशिक्षकाला एक महिन्याचा अल्टिमेटम देताना दिसत आहेत.