rahul gandhi
sakal
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून भाजपवर दलितविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यावर तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दलित समाजाचा वापर केल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरू प्रकाश पासवान आणि डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केला.