esakal | UP हिंसाचार: भाजपने मर्यादा ओलांडल्या; कॉंग्रेसचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

UP हिंसाचार: भाजपने मर्यादा ओलांडल्या; कॉंग्रेसचा हल्लाबोल

UP हिंसाचार: भाजपने मर्यादा ओलांडल्या; कॉंग्रेसचा हल्लाबोल

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात ब्लॉक पंचायत प्रमुखांच्या निवडणुकीत झालेल्या हिंसाचारावरून तसेच महिलांशी झालेल्या गैरवर्तनावरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली आहे. हा हिंसाचार मास्टरस्ट्रोक असल्याचा टोला कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपला लगावला आहे. तर, महिलांना निवडणुकीपासून रोखण्यासाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचा प्रहार प्रियांका गांधी वड्रा यांनी केला आहे.

हेही वाचा: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

ब्लॉक पंचायतमधील निवडणुकीतील हिंसाचाराबद्दल तसेच महिलांशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल भाजपने माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे महिलेला उमेदवारी दाखल करण्यापासून रोखले जात असल्याचा व्हिडिओ ट्विट करून भाजपवर तोफ डागली. काही वर्षांपूर्वी बलात्कार पीडित महिलेने भाजप आमदाराविरोधात आवाज उठविल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचे प्रयत्न झाले होते. आज एका महिलेला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले. यासोबतच, सरकार तेच आणि वर्तनही तेच, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा: केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर

हेही वाचा: मोदींचाच कृषी कायदा योग्य, ग्रामीण भागासाठी भाजपाची विशेष रणनीती

तर, राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात हिंसाचाराचे मास्टरस्ट्रोक असे नामकरण केले जात आहे, असे खोचक ट्विट करून या हिंसाचाराबद्दल भाजपची खिल्ली उडवली. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी या हिंसाचारावरून उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्था नसून जंगल राज आहे, असा आरोप केला. लखीमपूर खिरी येथे महिलेशी झालेले गैरवर्तन अतिशय लाजीरवाणे आहे. हेच कायद्याचे राज्य आणि लोकशाही आहे काय? असा संतप्त सवाल केला. तसेच या प्रकाराचा आता विचार करण्याची वेळ आली असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

loading image