Rice Scam : बिहारच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची भाजपची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP demands resignation of Bihar minister Sudhakar Singh Rice scam

Rice Scam : बिहारच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची भाजपची मागणी

नवी दिल्ली/पाटणा : बिहारमधील सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. कृषी मंत्री सुधाकर सिंह यांना २०१३ मधील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी हटविण्यात यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तसेच राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी केली. सुधाकर हे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) मंत्री आहेत. हा गैरव्यवहार पाच कोटी ३१ लाख रुपयांचा असून त्याबद्दल सुधाकर यांना तुरुंगाची हवा खावी लागल्याचे सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सुधाकर यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला तेव्हा त्यांना ६० लाख रुपये भरण्याचा आदेश देण्यात आला. १२ वर्षांच्या व्याजाची पाच कोटी ३१ लाख रुपये रक्कम धरून ते अजूनही १२ कोटी देणे आहे. सुधाकर यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता की नाही तसेच त्यांनी दिलेली माहिती खरी आहे की नाही हे नितीश यांनी स्पष्ट करावे.

तांदुळचोरीचा आरोप

सुधाकर हे नितीश कुमार यांच्या आधीच्या कार्यकाळातही मंत्री होते. त्यांची तांदळाची गिरणी आहे. २०१३ मध्ये त्यांनी सरकारबरोबर तांदूळ प्रक्रिया करार केला होता, पण सरकारने पुरविलेल्या तांदळाच्या त्यांनी चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ८० पेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले होते. याशिवाय अनेक जणांना अटक झाली होती.

Web Title: Bjp Demands Resignation Of Bihar Minister Sudhakar Singh Rice Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..