राष्ट्रवादाच्या प्रचाराचा भाजपचा निश्‍चय : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

उत्तर प्रदेशातील 40 विधनासभा मतदारसंघासाठी 17 हजार 926 मतदान केंद्रावर आज मतदान पार पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज (शनिवार) सकाळी नऊ वाजेपर्यंत 11 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

गोरखपूर - उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत मिळेल असा विश्‍वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाने विकास करण्याचा आणि राष्ट्रवादाच्या प्रचाराचा निश्‍चय केला असल्याचे सांगितले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. योगी आदित्यनाथ यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्यनाथ म्हणाले, "आम्ही केलेला प्रचार हा धार्मिक नव्हता. विकास करणे आणि राष्ट्रवादाचा प्रचार करणे हेच भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये जे काम केले आहे, जनता त्याची साक्षी आहे. त्यामुळेच जनता आम्हाला पाठिंबा देत आहे.'

उत्तर प्रदेशातील 40 विधनासभा मतदारसंघासाठी 17 हजार 926 मतदान केंद्रावर आज मतदान पार पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज (शनिवार) सकाळी नऊ वाजेपर्यंत 11 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: BJP determined to promote nationalism in country : Adityanath