भाजपचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून कपंन्याकडून 400 कोटीच्या देणग्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

देशात अच्छे दिन आले की नाही माहीत नाही, पण भाजपचे अच्छे दिन आले आहेत हे नक्की ! कॉर्पोरेट्सकडून भाजपला तब्बल 400 कोटींच्या देणग्या मिळाल्या असून विरोधकांच्या एकूण देणग्यांच्या तुलनेत भाजपला 15 पट अधिक देणग्या मिळाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: देशात अच्छे दिन आले की नाही माहीत नाही, पण भाजपचे अच्छे दिन आले आहेत हे नक्की ! कॉर्पोरेट्सकडून भाजपला तब्बल 400 कोटींच्या देणग्या मिळाल्या असून विरोधकांच्या एकूण देणग्यांच्या तुलनेत भाजपला 15 पट अधिक देणग्या मिळाल्याचे समोर आले आहे.

राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं (एडीआर) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला 437 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण 15 पट आहे. 

उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाला 20 हजार रुपयांपेक्षा अधिकची देणगी मिळालेली नाही. बसपानं या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात दिली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांना 20 हजारांहून अधिक रकमेच्या एकूण 4 हजार 201 देणग्या मिळाल्या आहेत. यातून मिळालेली रक्कम 469.89 कोटी इतकी आहे. यातील 437.04 कोटी रुपये एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. भाजपाच्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांची संख्या आणि देणग्यांमधून मिळालेली रक्कम अतिशय कमी आहे. काँग्रेसला 777 देणग्यांच्या माध्यमातून एकूण 26.65 कोटी रुपये मिळाले आहेत.

Web Title: BJP far ahead with 437 crore rupees in donations says report