esakal | भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना पुन्हा संधी
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda and rahul gandhi

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत.

भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना पुन्हा संधी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत. निष्ठावंत आणि लांगूलचालन करणारे अशातले हे साम्य नसून 'लूझर्स लक'बाबतचे हे साम्य आहे. दोन्ही पक्षांनी अनेक अपयशी नेत्यांना प्रोत्साहन आणि संगोपन करण्याचे काम सुरु केले आहे. मागील महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक फेरबदल करुन अनेक अपयशी नेत्यांना संधी दिली आहे. 

नड्डा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आठ महिन्यांनी शनिवारी आपली नवी टीम जाहीर केली. त्यांनी 12 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 जनरल सेक्रेटरी आणि 13 सेक्रेटरींची नेमणूक केली आहे. उपाध्यक्षाचे पद हे भाजपमध्ये औपचारिक असते, खरी ताकद ही जनरल सेक्रेटरीकडे असते. नड्डा यांनी अमित शहा यांच्या टीममधील तीन जनरल सेक्रेटरींना कायम ठेवले आहे, तर पाच जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे.


भारतात कोरोनाचा कहर; तीन राज्यांत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 

नवी टीम

तरुण चुघ, जनरल सेक्रेटरी

चुघ यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही. त्यांचा 2012 आणि 2017 मध्ये पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभव झाला आहे. अरुण जेटली यांच्या 2014 च्या अमृतसर लोकसभा निवडणुकीच्या मॅनेजमेंट टीममध्येही त्यांचा समावेश होता. त्यावेळी जेटली यांचा पराभव झाला होता. दिल्लीमध्येही त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती मात्र, भाजपला दिल्ली निवडणुकीत पराभव स्वीकाराला लागला. 

दुष्यंत कुमार गौतम, जनरल सेक्रेटरी

दुष्यंत कुमार यांचाही निवडणुकीत कधी विजय झाला नाही. 2008 आणि 2013 मध्ये दिल्लीच्या कोंडली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे.  त्यांना यावर्षी राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.

डी. पुरंदेश्वरी, जनरल सेक्रेटरी

पुरंदेश्वरी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर लढताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी आंध्रप्रदेशातून निवडणूक लढवली होती.

जनरल सेक्रेटरी आणि सेक्रेटरींकडे पक्षाची मोठी जबाबदारी असते. त्यांना वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी दिली जाते आणि तेथे पक्षाचा विजय व्हावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली जाते. नड्डा यांच्या टीममध्ये असे अनेक नेते आहेत, ज्यांनी केवळ एकदा निवडणूक जिंकली आहे. जनरल सेक्रेटरी दिलिप सायकिया आणि नवनियुक्त युवा मोर्चाचे प्रमुख तेजस्वी सुर्या यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. हे दोन्ही नेते मोदी लाटेत तरले असल्याचे सांगितलं जातं. 


निवडणुकीआधी आयकर बुडवणाऱ्या ट्रम्प यांचा केसांवरचा खर्च थक्क करणारा!

ध्रुवीकरण

अमित शहा यांच्या टीममध्ये विजयी नेते होते अशातली गोष्ट नाही. अनेकजण निवडून न आलेले किंवा निवडून येण्याची क्षमता नसलेले नेते शहा यांच्या टीममध्ये होते. मात्र, अमित शहा यांनी या नेत्यांची कधी काळजी केली नाही. कारण, शहा स्वत: सर्व राज्यांवर बारिक लक्ष ठेवून होते. शहा यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमची जबाबदारी केवळ आदेश पाळण्याची होती. त्यांना निकालाची काही काळजी करण्याची गरज नव्हती. मात्र, नड्डा यांच्या नेतृत्वामध्ये अपयशी नेत्यांना संधी देणे एक सट्टा ठरणार असल्याचं मानलं जातं

नड्डा यांनी काही उद्धिष्ठ समोर ठेवून नवी टीम निवडल्याचे सांगितले जाते. युवांना संधी देऊन पुढील नेतृत्व निर्माण केले जात आहे. नड्डा यांच्या टीमला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची निश्चितच मान्यता असणार आहे. येत्या काळात मोदींच्या अजेंड्यापेक्षा ध्रुवीकरणावर भाजपचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तेजस्वी सुर्या यांच्या निवडीने आपल्याला हे दिसून येईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुर्या प्रकाशझोतात आले आहेत. आता त्यांच्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी देऊन पक्षाने मोठा विश्वास दाखवला आहे. सुर्या यांनी अमित शहा यांना बंगळुरु कसे भारतविरोधी कारवाईंचे केंद्र बनत आहे, हे सांगितलं होतं.

जनरल सेक्रेटरी दिलीप सायकिया हे सीएए CAA आणि एनआरसीचे NRC कट्टर समर्थक राहिले आहेत. तरुण चुघ यांनी शाहीन बागचा उल्लेख 'शैतानी बाग' असा केला होता. तसेच दिल्लीला आम्ही सीरिया होऊ देणार नाही, असं ते म्हणाले होते. नड्डा यांनी आयटी आणि सोशल मीडियाचा भार अमित मालविया यांच्याकडेच कायम ठेवला आहे. अमित मालविया आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले आहेत. 

(EDITED BY- KARTIK PUJARI)