भाजपसाठी जीडीपी म्हणजे, 'गोडसे डिवीसिव पॉलिटिक्स'

टीम-ई-सकाळ
Friday, 29 November 2019

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जीडीपीचे आकडे हे धक्कादायक समोर येत असताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी भाजपसाठी जीडीपी म्हणजे, गोडसे डिवीसिव पॉलिटिक्स असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जीडीपीचे आकडे हे धक्कादायक समोर येत असताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी भाजपसाठी जीडीपी म्हणजे, गोडसे डिवीसिव पॉलिटिक्स असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

जीडीपी आकड्यानुसार भारताची अर्थव्यवस्था ही डबघाईला आलेली दिसते. भारताची जीडीपी ही ४.५पर्यंत खाली आलेली आहे. पंरतु, गोष्टीची कुठल्याच प्रकारची चिंता सत्ताधारी भाजपला नसल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. भाजप काही गोष्टीवर आनंदी आहे. त्यांच्या मते जीडीपी म्हणजे गोडसे डिवीसीव्ह पॉलिटिक्स असून काही दिवस असेच चालू राहिले तर जीडीपी खाली येऊन अडीच पर्यंत येईल असेही सुरजेवाला यांनी म्हटले. सुरजेवाला पुढे म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असून तरुणांच्या हाताला काम नाही. मोठमोठे उद्योगधंदे बंद होत आहेत. देशात मंदी असून भाजप नेत्यांना चेष्टा सुचत असल्याचेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेने सप्टेंबर अखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत साडेसहा वर्षांतील सर्वांत नीचांकी म्हणजेच 4.5 टक्के विकासदर नोंदवला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलून देखील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचा विकासदर घसरून 4.5 टक्‍क्‍यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने यासंदर्भातील आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली.

उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

जून महिन्यात देशाची जीडीपीची वाढ घसरून पाच टक्‍क्‍यांवर आल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या तिमाहीत विकासदर आणखी घसरत 4.5 टक्‍क्‍यांवर आला आहे. याआधी 2013-14 या आर्थिक वर्षात मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत विकासदर 4.3 टक्‍क्‍यांपर्यत घसरला होता. मागील सलग सहा तिमाहींपासून देशाच्या जीडीपीमध्ये सातत्याने घसरण होते आहे. याआधी विकासदरातील वाढ मार्च 2019 अखेर नोंदवली गेली आहे. त्यावेळेस जीडीपीचा विकासदर 8.13 टक्के इतका होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For BJP GDP is Godse Divisive Politics says Randeep Surjewala