
Manipur Election Result: मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत
मणिपूर राज्यामधील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झालीय. मणिपूरच्या 60 जागांसाठीच्या लढतीवर आज निकाल येत आहे. यात विशेष म्हणजे मणिपुरमध्ये भाजप आपलं नशिब आजमावताना दिसत आहे. मणिपूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून 31 जागांवर पक्षानं आघाडी घेतलीय.
हेही वाचा: Goa Election Results LIVE | भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली
2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं 28 जागा जिंकल्या, तर भाजपला मणिपूरमध्ये 21 जागांवर विजय मिळाला तरीसुध्दा सर्वाधिक जागा जिंकुन काँग्रेस इथे सत्ता स्थापन करु शकला नाही. भाजपनं नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंट आणि लोक जनशक्ती पार्टी सोबत आघाडी केली आणि सत्ता हाती घेतली. एन. बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपनं 2017 मध्ये पहिल्यांदाच मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं. त्या आधी 15 वर्षं मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आता या वेळेसही भाजपच सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे.
Web Title: Bjp Has A Clear Majority In Manipur Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..