Goa Assembly Election Results LIVE News |Goa Election Results LIVE |भाजपचा सत्तेवर दावा... तर 'आप'ला २ जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goa Assembly Election Results LIVE News
Live

Goa Election Results LIVE |गोव्यात भाजपच्या पाठिशी अपक्षांसह मगोप, मॅजिक फिगर गाठली

Goa Election Results 2022 : देशातील पाच राज्यांची मतमोजणी आज पार पडत आहे. यामध्ये सर्वात छोट्या म्हणजेच गोव्यातही राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली. १४ फेब्रुवारीला ४० विधानसभेच्या जागांसाठी गोव्यात मतदान पार पडलं होतं. मागच्या वेळी सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसला यंदा विजयाच्या आशा आहेत. यासाठी पी. चिदंबरम गोव्यात दाखल झाले आहेत. (Goa Assembly Election Results LIVE Updates)

तर भाजपला यावेळी सत्ता राखण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांच्या 'आप'शी टक्कर द्यावी लागणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या स्पर्धेत शिवसेना आणि राष्ट्रवादीही नशीब आजमावत आहेत. याशिवाय पारंपारिक गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या सक्रीय होण्याने होळी आधीच गोव्याच्या निवडणुकांमध्ये रंग भरले आहेत.

गोव्यात ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. उमेदवारांच्या समोर स्ट्रॉंग रुम उघडण्यात आल्या असून, दक्षिण गोव्याची मतमोजणी दामोदर कॉलेजमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचिका कटियाल यांनी दिली आहे.

01:01 PM,  Mar 10 2022

निवडणूक आयोगानुसार गोव्यातील आकडेवारी

भाजप - 20

काँग्रेस - 10 ( 1 जागेवर आघाडीवर)

अपक्ष - 3

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष - 2

आप - 2

गोवा फॉर्वड पार्टी - 1

रिव्होल्युशनरी गोवन पार्टी - 1

12:46 PM,  Mar 10 2022

मगोपचे समर्थनपत्र

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समर्थनपत्र दिले.

12:27 PM,  Mar 10 2022

नॉर्थ गोव्यात भाजपची मुसंडी

उत्तर गोव्यातील 19 विधानसभा मतदार संघापैकी 10 मतदार संघात भाजपचा विजयी झेंडा. सहा जागा काँग्रेसने जिंकल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि रिव्होल्युशनरी गोवन पार्टी यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली.

11:40 AM,  Mar 10 2022

गोव्यात आपला पहिल्याच झटक्यात दोन जागा

आम आदमी पार्टी पहिल्यांदा गोव्यात निवडणुका लढवत होती. मात्र, पक्षाने पहिल्याच दमात दोन जागांवर दणदणीत विजय मिळवत त्यांनी गोव्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.

10:50 AM,  Mar 10 2022

गोव्यात भाजपचा जल्लोष 

गोव्यात भाजपचे सेलिब्रेशन सुरू. गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत पणजी कार्यालयात दाखल.

10:38 AM,  Mar 10 2022

गोव्यातील दोन दांपत्यही विजयी 

बाबुश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात पणजी आमि तोलैगोवा मतदार संघातून विजय भाजपचे विश्वजीत राणे आणि त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे देखील वालपोई आणि पोरियम मतदार संघातून विजयी

10:19 AM,  Mar 10 2022

निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून मिळणाऱ्या माहितीनुसार गोव्यात भाजपने आतापर्यंत 14 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 5 जागांवर विजयी झाला आहे. गोवा फॉर्वड पार्टी 1 तर अपक्ष 3 जागांवर विजयी झाले आहेत. आप 1 जागेवर विजयी तर 1 जागेवर आघाडीवर आहे.

09:49 AM,  Mar 10 2022

आपने गोव्यातही उघडले खाते 

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाजपने आतापर्यंत 7 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसचे 4 तर अपक्ष 2 उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये 91 जागांवर आघाडीवर असणाऱ्या आम आदमी पक्षांने गोव्यातही आपले खाते उघडले आहे. गोव्यात आपचा एक उमेदवार विजयी झाला असून एक आघाडीवर आहे.

09:34 AM,  Mar 10 2022

लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला : फडणवीस

भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गोव्यातील लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिली आहे. आम्हाला 20 जागा मिळाल्या आहेत. याच्यापेक्षा एक दोन जास्तच मिळतील. लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला. अपक्ष विजयी उमेदवार आमच्यासोबत येत आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही आमच्यासोबत येईल. या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही सरकार स्थापन करणार आहोत.

08:55 AM,  Mar 10 2022

आम्ही जनतेचं मत मान्य करतो - काँग्रेस

गोव्यातील निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजप २ आणि काँग्रेसला एका जागेवर बहुमत मिळालंय. तर, अद्याप भाजपची १८ जागांवर आघाडी आहे. यंदा काँग्रेसला १२ जागांवर आघाडी मिळवण्यात यश आलं. मात्र, हा पराभव मान्य कर असल्याचं काँग्रेसचे मायकल लोबो यांनी म्हटलंय. जनतेचा कौल आम्ही मान्य केला, असं ते म्हणाले.

08:13 AM,  Mar 10 2022

अपक्ष भाजपच्या कळपात सामील

बिचोलीमचे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

08:04 AM,  Mar 10 2022

निवडणूक आयोगाचा अधिकृत निकाल 

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले असून भाजप 18 तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे.

07:53 AM,  Mar 10 2022

अवघ्या 500 मतांनी जिंकलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया

गोव्यातील भाजपच्या विजयाचे सर्व श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाते. गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार. माझ्या मतदार संघात मी नसतानाही कार्यकर्त्यांनी काम केलं. मी माझ्या विजयाचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांना देतो. : प्रमोद सावंत

06:56 AM,  Mar 10 2022

भाजपने सत्तास्थापनच्या हालचाली केल्या सुरू 

गोव्यात भाजपच्या नेत्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप नेते राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटण्यासाठी जात आहेत. ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

06:39 AM,  Mar 10 2022

गोव्यात काँग्रेस डबल फिगरच्या आत गुंडळणार? 

गोव्यातील आकडे होत आहेत स्थीर; भाजप 18 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर आहे.

06:12 AM,  Mar 10 2022

पणजीतून उत्पल पर्रिकर यांचा पराभव

पणजीत दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पलने (Utpal Parrikar) बंडखोरी केल्याने देशाचे लक्ष येथे लागले होते. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात व अपक्ष उत्पल यांच्यातच तुल्यबळ लढत होती. गेल्या वेळी मोन्सेरात अवघ्या १७५८ मतांनी विजयी झाले होते. पणजीचे दोनदा आयुक्त राहिलेले सनदी अधिकारी एल्विस गोम्स कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.

05:54 AM,  Mar 10 2022

विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा आघाडीवर 

गेल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आघाडीवर आले आहेत. यामुळे भाजपच्या जीवात जीव आला.

05:45 AM,  Mar 10 2022

विश्वजीत राणेंचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य

भाजपचे नेते विश्वजीत राणे यांनी गोव्यातील निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, गोव्यात आम्ही मोठे यश मिळवले आहे. लोकांनी घोटाळेबाज आणि बाहेरच्यांना नाकारले आहे. गोव्यातील लोकांसाठी ज्या पक्षाने गोव्यासाठी काम केले त्यांनाच जनतेने मतदान केले. विश्वजीत राणे हे प्रमोद सावंत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, प्रमोद सावंत मुख्यमंत्री पदी कायम राहाणार की नाही याबाबत पक्ष निर्णय घेईल.

05:35 AM,  Mar 10 2022

भाजप पुन्हा 20 च्या आत? 

बहुमताच्या आकड्याचा भाजपशी खेळ; भाजप पुन्हा 20 च्या आत, सध्या 18 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसची 13 जागांवर आघाडी

05:30 AM,  Mar 10 2022

राणे दाम्पत्य आजुनही आघाडीवर...

वाळपई मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे हे 5000 मतांनी पुढे आहेत; तर त्यांची पत्नी दिव्या राणे या पर्ये मतदारसंघातून 8000 मतांनी आघाडीवर आहेत.

05:30 AM,  Mar 10 2022

पणजी मतमोजणीचा तिसरा टप्पा

बाबूश मोन्सेरात: 4397

एल्विस गोम्स: 1898

उत्पल पर्रीकर: 3693

पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात 334 मतांनी आघाडीवर

05:08 AM,  Mar 10 2022

गोव्यात गड येणार पण सिंह जाणार? 

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत अजूनही पिछाडीवरच

05:04 AM,  Mar 10 2022

विजय सरदेसाई आघाडीवर

फातोर्डा मतदारसंघातून विजय सरदेसाई 2000 मतांनी पुढे

05:04 AM,  Mar 10 2022

आपचे अमित पालेकर पिछाडीवर

आपचे सांताक्रुज मतदारसंघाचे उमेदवार अमित पालेकर हे सध्या पिछाडीवर आहेत.

04:41 AM,  Mar 10 2022

4 जागांवर आघाडीवर असणारी तृणमूल किंग मेकरच्या भूमिकेत?

  • गोव्यात काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच; भाजप 18 तर काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर

  • मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पिछाडीवर

  • विजय सरदेसाई देखील 593 मतांनी आघाडीवर, जोशुआ डिसुझा151 तर दयानंद माेंडलेकर 157 मतांनी आघाडीवर

  • गोव्यात 40 पैकी 13 जागांचे चित्र; भाजप 7 तर काँग्रेस 3 जागांर आघाडीवर

  • बाबुश मोंत्सेरा पणजी येथून 383 ने आघाडीवर

04:22 AM,  Mar 10 2022

पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर 

पहिल्या फेरीअखेर भाजपची 13 तर काँग्रेसची 7 जागांवर आघाडी; मागोपा 2 आपही 1 जागेवार आघाडीवर

04:15 AM,  Mar 10 2022

डिकोस्टा आघाडीवर

क्वेपम मतदार संघात काँग्रेसचे डिकोस्टा आघाडीवर तर भाजपचे चंद्रकांत कवळेकर पिछाडीवर

04:13 AM,  Mar 10 2022

 विश्वजीत राणे आघाडीवर

भाजपचे विश्वजीत राणे वालपोई मतदार संघाजून आघाडीवर

04:04 AM,  Mar 10 2022

गोव्यात भाजपने काँग्रेसला केले ओव्हटेक;

गोव्यात सध्या भाजप 18 तर काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर आहे. निकालाला सुरूवात झाली त्यावेळी काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर होती. मात्र आता काँग्रेसची पिछेहाट होत आहे.

03:24 AM,  Mar 10 2022

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

आम्हाला बहुमत मिळेल असा विश्वास आहे, काँग्रसला काय वेळ घ्यायचा आहे तो घेऊ देत : प्रमोद सावंत

03:13 AM,  Mar 10 2022

गोव्यात भाजपची ८ जागांवर आघाडी  

गोव्यात भाजप 8 जागांनी आघाडीवर राज्यात 8.30 पर्यंत भाजप 16 जागांनी आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस 11 जागांवर मागे आहे. गोव्यातील 8.30 पर्यंतचा ट्रेंड समोर आला असुन, येथे भाजप 16 जागांवर पुढे आहे. त्याचवेळी काँग्रेस केवळ 11 जागांवर आघाडीवर आहे. तर टीएमसी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे.

गोवा ब्रेकींग : मडगाव मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू. सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे.

टॅग्स :Goa Election 2022