esakal | विधानभवनात नमाजसाठी जागा; त्यानंतर भाजपने केली खास मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Jharkhand assembly

विधानभवनात नमाजसाठी जागा; त्यानंतर भाजपने केली खास मागणी

sakal_logo
By
सुधीर काकडे

झारखंड विधानसभेच्या (Jharkhand Assembly) नव्या इमारतीमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने नमाज पठन करण्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. विधानसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम आमदारांना नमाज पठन करण्यासाठी मंत्रालयाच्या नव्या इमारतीतील टीडब्ल्यू ३४८ ही खोली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो (Ravindranath Mahto) यांच्या आदेशानुसार उपसचिव नवीन कुमार यांनी हा निर्णय घेतला होता.

विधानसभा अध्यक्षांनी नमाजसाठी खोलीची परवानगी देताच भारतीय जनता पक्षाने विधानसभा परिसरात हनुमान मंदीर बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी केली आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सीपी सिंह यांनी ही मागणी करताना, आम्ही नमाज पठन करण्यासाठी जागा देण्याच्या निर्णयाच्या विरोधात नाही, मात्र विधानसभेच्या परिसरात मंदीर देखील बनवले पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे सांगितले. विधानसभा परिसरात हनुमान मंदीराची स्थापना केली जावी, जर विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली तर, आम्ही स्वखर्चाने हे मंदीर बांधू असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: ममतांना दिलासा! पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन सुरु होताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते रवींद्रनाथ महतो हे सध्या झारखंड विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांनी काही दिवसांपुर्वी विधानसभेतील मुस्लिम आमदारांना नमाज पठन करण्यासाठी मंत्रालयातील एक खोली देण्याची परवानगी दिली होती.

loading image
go to top