BJP : हरियानात भाजपने भाकरी फिरविली

नायबसिंह सैनी नवे मुख्यमंत्री अन्य पाचजणांचा शपथविधी
BJP
BJPsakal

चंडीगड : हरियानाचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज स्वतःच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायबसिंह सैनी (वय ५४) यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर सैनी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर सैनी यांनी तातडीने राजभवन गाठत राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पक्षाचे हरियाना प्रभारी विप्लव देव हे उपस्थित होते.

BJP
Health Care News : हृदय निरोगी ठेवायचं असेल तर, सकाळी 'या' पेयांनी दिवसाची सुरुवात करा

राजभवनामध्ये आज सायंकाळी सैनी यांच्यासह अन्य पाचजणांचा शपथविधी पार पडला. सैनी हे खट्टर यांचेच विश्वासू म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच आज भाजप नेतृत्वाने हरियानामध्ये भाकरी फिरविली. हरियानात यंदा ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आज राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे राजीनामा सादर केला होता.

लोकसभेसाठीच्या जागा वाटपावरून भाजप आणि जननायक जनता पार्टीमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतरच ही मोठी घडामोड घडली आहे. सध्या नव्वद सदस्यांच्या राज्यविधिमंडळात ४१ सदस्य भाजपचे असून दहाजण हे जननायक जनता पक्षाचे आहेत. भाजप सरकारला सहा ते सात अपक्षांचा पाठिंबा आहे. काँग्रेस हा विधिमंडळातील मुख्य पक्ष असून त्यांच्याकडे ३० आमदारांचे बळ आहे. लोकदल आणि हरियाना लोकहित पक्षाकडे प्रत्येकी एक जागा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com