दलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष; सावित्रीबाईंचा भाजपला रामराम

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

''भाजप समाजाचे विभाजन करत आहे. पक्षामध्ये माझे काहीही ऐकले जात नाही, दलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे''.

-  खासदार सावित्रीबाई फुले

नवी दिल्ली : बहराइच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज (गुरुवार) भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला. ''भाजप समाजाचे विभाजन करत आहे. पक्षामध्ये माझे काहीही ऐकले जात नाही, दलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे'', असा आरोप सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. 

आरक्षण संपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधान संपविण्याचा योजना आखण्यात येत आहेत. राजीनाम्यासह 23 डिसेंबरला लखनौच्या रमाबाई मैदानात महारॅलीची घोषणाही केली आहे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले 'संविधान' वाचविण्यासाठी रॅली काढण्यात येईल. संविधान आणि आरक्षणाच्या आंदोलनाला आता ते पुढे जातील. मी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा देत आहे. मात्र, मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देणार नाही, असे सावित्रीबाई फुले यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, ''राम हे मनुवादी आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर ते दलित नव्हते तर त्यांना मनुष्य का बनवले नाही? त्यांना वानरच का बनवले? त्यांचा चेहरा काळा का ठेवला. हनुमान दलित होते, म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले होते'', असे वक्तव्य सावित्रीबाई फुले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आज त्यांनी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला.

Web Title: BJP Ignores me Because I am Dalit says MP Savitribai Phule