Waqf Act Reforms : भाजपने वक्फ कायद्यातील सुधारणा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी २० एप्रिल ते ५ मेदरम्यान देशव्यापी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणांची माहिती देण्यासाठी देशव्यापी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या २० एप्रिल रोजी या मोहिमेची सुरुवात होणार असून ५ मे रोजी त्याची सांगता होईल.