लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी वीरेंद्र कुमार

parliament
parliament

नवी दिल्ली : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात येईल. 

मध्य प्रदेशातील तिकमगढ लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी होणार आहे. तसेच लोकसभेची पहिली बैठकीतही तेच अध्यक्ष असतील. याठिकाणी लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यात येईल.

सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 17 जूनपासून सुरु होत आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये खासदारांना शपथ देण्यात येईल. नव्या अध्यक्षांची निवड 19 जूनला करण्यात येईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संसदेच्या दोन्ही सभागृहांना 20 जूनला सकाळी 11 वाजता संबोधित करणार आहेत. 5 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com