माझ्याशी असं बोलायची हिंमत कशी केलीस? चपलेने मारले...

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

माझ्याशी असं बोलायची हिंमत कशी केलीस? असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्याने एका सरकारी कर्मचाऱयाला चपलेने मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

हिसार (हरियाणा) : माझ्याशी असं बोलायची हिंमत कशी केलीस? असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्याने एका सरकारी कर्मचाऱयाला चपलेने मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

क्वारंटाइन सेंटरमध्ये केला जबरदस्त डान्स अन्...

टीकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांनी एका मार्केट कमिटीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांसह पोलिस उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणजिसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करून खट्टर सरकारला सरकारी नोकरी करणे अपराध आहे का? असे विचारत याबाबत जाब विचारला आहे.

मासा घुसला शरीरात अन् झाली तडपड...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक शेड उभारण्यावरून सोनाली फोगाट आणि मार्केट कमिटीचा कर्मचारी यांच्यात वाद झाला. त्यानंतर माझ्याशी असे बोलायची हिंमत कशी केलीस? असे म्हणत सोनाली फोगाट यांनी कर्मचाऱयाला चपलेने मारहाण केली. यावेळी उपस्थितांनी मारहाण होत असतानाची घटना मोबाईलमध्ये कैद केली. दरम्यान, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्यानंतर सोनाली फोगाट यांच्यावर टीका होऊ लागली. मात्र, त्यांनी या कर्मचाऱ्यानं आपल्याशी बोलताना अपशब्द वापरल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी टीका सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप लावले जात आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

मॅनेजरने प्रेयसीची छायाचित्रे विकली ऑनलाईन...

सोनाली फोगाट या टीकटॉकवर लोकप्रिय आहे. भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. हरियाणाच्या आदमपूरमधून भाजपच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांनी त्यांचा पराभव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader and tiktok star sonali phogat beating up government committee member video viral