भाजप नेत्याने मागितली न्यायालयाची माफी 

भाजप नेत्याने मागितली न्यायालयाची माफी 

चेन्नई (पीटीआय) : न्यायालयाविरोधात अपमानास्पद वक्‍तव्य केल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय चिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात सोमवारी बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर न्यायालयाने राजा यांच्याविरोधातील अवमान कारवाई मागे घेतली. 
न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्देशनानुसार एच. राजा हे न्या. सी. टी. सेल्वम आणि न्या. एम. निर्मल कुमार यांच्या खंडपीठापुढे राजा आज उपस्थित होते. "हे वक्तव्य केले तेव्हा मी भावूक झालो होतो. 

याबद्दल मी न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो,' असे राजा यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रकरणी 17 सप्टेंबर रोजी खंडपीठाने राजा यांच्याविरोधात "सु मोटो' याचिका दाखल केली होती. सप्टेंबरमध्ये तमिळनाडूतील पुडुकोट्टी येथे गणेश चतुर्थीदिवशी मिरवणुकीच्या मार्गावरून एच. राजा यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. त्या वेळी त्यांनी पोलिसांना "हिंदूविरोधी', "भ्रष्टाचारी', असे संबोधले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ठरावीक मार्गावरून गणेश मिरवणूक नेण्याची परवानगी देता येणार नाही, असे निदर्शनास आणून दिले असता त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाविरोधात अपमानास्पद विधाने केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com