'आझम खान यांचे शीर संसदेच्या दरवाजावर टांगा'

BJP leader calls for chopping off Azam Khans head
BJP leader calls for chopping off Azam Khans head

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगण्यात यावे, असे भाजप नेते आफताब अडवाणी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझमखान यांनी गुरुवारी (ता. 25) लोकसभेतील चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी रमादेवी यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाले. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी खान यांच्या वतीने समाजवादी पक्षानेच माफी मागावी, अशी मागणी केल्याने अखिलेश यादव यांची कोंडी झाली होती. हा प्रकार अंगलट येत असल्याचे लक्षात येताच आझम खान यांनीही आपण काही आक्षेपार्ह बोललो असू तर राजीनामा देऊ, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेमध्ये तोंडी तलाकच्या विषयावरून सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना आझम खान यांची जीभ घसरली. केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या भाषणात हस्तक्षेप करणाऱ्या आझम खान यांनी "तू इधर उधर की बात ना कर' असे उद्‌गार काढले. या वेळी पीठासीन अधिकारी रमादेवी यांनीही खान यांना तुम्ही इकडे तिकडे पाहू नका आपले म्हणणे मांडा, अशा शब्दांत सुनावले. यावर आझम खान यांचा मूड अचानक शायराना झाला आणि त्यांनी रमादेवी यांना उद्देशून आक्षेपार्ह शायरी ऐकविली. आझम खान यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. रमादेवी यांनी आपण आझम खान यांच्यासाठी त्यांच्या लहान बहिणीसारखे असल्याचे सांगितले, तसेच आझमखान यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकले जावे, अशी सूचना केली.

आफताब अडवाणी म्हणाले, 'आझम खान यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आझम खान यांचे शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगण्यात यावे. देशात जेव्हा गंभीर समस्येवर चर्चा होते, तेव्हा नेहमी आझम खान आणि ओवैसी वाद निर्माण करतात. त्यामुळे महिलांचा अपमान करणाऱ्यांना असे केल्यास काय परिणाम होतात याची जाणीव होईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com